MPSC Job : MPSC म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आता 8169 पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. महाराष्ट्र अराजपत्रित ग्रुप बी आणि ग्रुप सी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा तपशील जाहीर केला आहे.
ही परीक्षा या वर्षी म्हणजे 30 एप्रिल 2023 रोजी घेण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही परीक्षा राज्यातील एकूण 36 केंद्रावर पार पडणार आहे.
ही पदे भरली जाणार
सहाय्यक कक्ष अधिकारी – 78 पदे
राज्य कर निरीक्षक – 159 पदे
पोलीस उप निरीक्षक – 374 पदे
दुय्यम निबंधकची (मुद्रांक निरीक्षक) – 49 पदे
दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) – 6 पदे
तांत्रिक सहाय्यक – 1 पद
कर सहाय्यकची – 468 पदे
लिपिक टंकलेखकची – 7034 पदे
मिळणार आकर्षक पगार
हे लक्षात घ्या की, सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक तसेच दुय्यम निबंधक-मुद्रांक निरीक्षक या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना एकूण 38 हजार 600 ते 1 लाख 22 हजार 800 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.
त्याचप्रमाणे दुय्यम निरीक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क संवर्गातील गृह विभागासाठी निवड झालेल्या उमेदवारांना महिन्याला एकूण 32 हजार ते 1 लाख 1 हजार 600 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.
तांत्रिक सहाय्यक संवर्गातील उमेदवारांना 29 हजार 200 ते 92 हजार 300 रुपयांपर्यंत तर कर सहाय्यक संवर्गातील उमेदवारांना 25 हजार 500 ते 81 हजार 100 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल. त्याशिवाय लिपिक टंकलेखक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना एकूण 19 हजार 900 ते 63 हजार 200 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.
या दिवशी होणार परीक्षा
गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2 सप्टेंबर 2023 रोजी तर गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 9 सप्टेंबर 2023 रोजी घेतली जाणार आहे.
करावे लागणार नियमांचे पालन
प्रत्येक उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या अटी आणि शर्तींचे पालन करणे खूप गरजेचे आहे.
द्यावी लागणार या वेबसाइटला भेट
जर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला एमपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर https://mpsc.gov.in/ जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
होऊ शकतो बदल
हे लक्षात घ्या की पदसंख्या आणि आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सूचनेनुसार बदल किंवा वाढ होऊ शकतो.जर असे काही झाले तर त्याचा समावेश मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमध्ये केला जाईल. तसेच यासंदर्भातील सूचना वेळोवेळी आयोगाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येतात.