Aadhaar Card : फक्त एक क्लिक आणि बदलली जाईल तुमची जन्मतारीख, त्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Published on -

Aadhaar Card : आधार कार्ड हे सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. सरकारी प्रक्रियेतही आधार कार्डचा ओळखपत्र म्हणून वापर केला जातो. अनेकांच्या आधारमध्ये जन्मतारीख चुकलेली असते.

ही जन्मतारीख ऑफलाईन आणि ऑनलाइन बदलण्यात येते. परंतु, ऑफलाईन बदलण्याची प्रक्रिया खूप किचकट आहे. मात्र ऑनलाइन एका क्लिकवर जन्मतारीख बदलली जाते.

फॉलो करा या स्टेप्स

स्टेप 1

  • जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डमधील जन्मतारीख बदलायची असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम http://ssup.uidai.gov.in/ssup या अधिकृत लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • तुम्हाला तेथे ‘Proceed to Update Aadhaar’ वर क्लिक करावे लागेल.
  • तुमच्या आधार क्रमांकाने लॉग इन करा.

स्टेप 2

  • स्क्रीनवर दिलेला कॅप्चा कोड टाकून ओटीपी पाठवा वर क्लिक करा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
  • तो OTP टाकून सबमिट करा.

स्टेप 3

  • त्यानंतर तुम्हाला येथे दोन पर्याय मिळतील. ‘सपोर्टिंग डॉक्युमेंट प्रूफसह ऍड्रेस डेमोग्राफिक डिटेल्स अपडेशन” आणि ‘पत्ता प्रमाणीकरण पत्राद्वारे पत्ता अपडेट’
  • दस्तऐवजाच्या पुराव्यासह नाव, जन्मतारीख, लिंग आणि पत्ता अपडेट करण्यासाठी तुम्हाला ‘अपडेट डेमोग्राफिक्स डेटा’ वर क्लिक करावे लागणार आहे.

स्टेप 4

  • तुम्हाला तुमच्या आधार कार्डमध्ये जे काही अपडेट करायचे आहे, ते निवडावे लागेल.
  • सर्व तपशील भरून तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला OTP व्हेरिफाय करा.
  • सगळ्यात शेवट बदल जतन करा.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe