Jyotish Tips : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर अनेक चांगले आणि वाईट योग निर्माण करत असतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर तसेच पृथ्वीवर झालेला आपल्याला दिसून येतो. यंदाच्या वट सावित्री दिवशी गजकेसरी योग तयार होत आहे. त्यामुळे याचा फायदा काही राशींना होणार आहे.
वट सावित्री व्रताच्या वेळी सावित्री आणि सत्यवान यांची कथा सांगण्यात येते. यंदाच्या वट सावित्री दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योग तयार होत आहे, कारण या दिवशी चंद्र आणि गुरूचा संयोग मेष राशीत होणार असल्याने याचा काही राशींवर विशेष प्रभाव पडणार आहे.
या राशींचे बदलणार भाग्य
1. मेष
या राशींच्या लोकांचे जमीन आणि मालमत्तेशी निगडित काही प्रश्न असतील तर सुटतील. तुम्हाला मालमत्तेत नफा मिळेल शिवाय तुम्हालाही कामात यश मिळेल. या राशीचे व्यापारी लाभात राहतील. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. इतकेच नाही तर यासोबतच सर्जनशील आणि कलात्मक क्षेत्राशी निगडित असणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप फायदेशीर असणार आहे.
2. मिथुन
या काळात तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. तर तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने जुनाट आजारांपासून मुक्ती मिळू शकते. हा काळ तुमच्यासाठी भाग्यवान असल्याने त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात फायदा होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप फायदेशीर असणार आहे.
3. तूळ
तुमच्या राशीसाठीही हा काळ खूप फायदेशीर असणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्ये वाढ होईल त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. तसेच याचा व्यापाऱ्यांना मोठा फायदा होईल. तसेच तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल.