Jyotish Tips : होईल पैशांचा पाऊस! लक्ष्मी देवीला प्रसन्न करायचे असेल तर आजच करा ‘हे’ उपाय

Ahmednagarlive24 office
Published:

Jyotish Tips : सध्याच्या काळात पैशाला खूप महत्त्व आले आहे. तुम्हाला कोणतीही गोष्टी खरेदी करायची असेल तर तुमच्याकडे पैसे असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्वजण पैसे कमवण्यासाठी नोकरी किंवा व्यवसाय करत असतात.परंतु सध्याच्या काळात कमीत कमी वेळेत खूप जास्त पैसे कमवायचे असतात.

त्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपायही करत असतात. मात्र अनेकांकडे उपाय करूनही पैसे टिकत नाही. जर तुम्हालाही अशी समस्या येत असेल तर आजच काही उपाय करा. तुमच्याही घरात होईल पैशांचा पाऊस. कसे ते जाणून घ्या.

या उपायांनी प्रसन्न होईल लक्ष्मी

1. जर तुमच्या घरात पूजा कक्ष किंवा पूजास्थान असेल तर देवतांचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे ठेवा. कारण देवतांचे मुख कधीही दक्षिणेकडे करू नये. तसेच घरातील सदस्यांनी पूजा करत असताना दक्षिणेकडे तोंड करू नये.

2. शुभ मुहूर्तावर चांदीवर बनवण्यात आलेले श्रीयंत्र अभिषेक करा. हे श्रीयंत्र पूजेच्या ठिकाणी किंवा तिजोरीत ठेवा तरच तुमच्या घरात पैसा राहील. जर तुमची इच्छा असल्यास तुम्हाला हे श्रीयंत्र पूजास्थळी ठेवून पूजा करता येईल. हा उपाय तुम्हाला रातोरात श्रीमंत बनवू शकतो.

3. जर तुम्हाला वाईट नजर दूर करायची असेल तर रोज सकाळ संध्याकाळ घराच्या मंदिरात देशी तुपाचा दिवा लावून आरती करावी. जर तुम्हाला हे शक्य नसेल तर कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात करावा.

4. तसेच शुभ मुहूर्तावर काळ्या हळदीचा गुंठ घराच्या तिजोरीत ठेवा. त्यामुळे पैसे आणि व्यवसायावरील वाईट नजर दूर होऊन संपत्तीचा प्रवाह सुरू होईल.

5. इतकेच नाही तर वर्षातून कमीत कमी एकदा तरी आपल्या घरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी श्री रामचरितमानसचे अखंड रामायण पठण करावे. या पाठानंतर हवन करा कारण या उपायाने सर्व ग्रहांचे दोष दूर होऊन देवतांचा आशीर्वाद मिळतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe