Jyotish Tips : सावधान! तुमच्याही कुंडलीत तयार झाला ‘हा’ सर्वाधिक घातक योग तर तुमच्यावर येईल आर्थिक संकट

Published on -

Jyotish Tips : सर्व ग्रह ठराविक काळानंतर स्थान बदलत असतात. त्याचा परिणाम हा राशींवर होतो. ठराविक ग्रहांचा काही राशींवर वाईट परिणाम होतो तर काही राशींवर चांगला परिणाम होतो. अनेकदा कुंडलीत काही योग तयार होतात.

परंतु अनेकदा कुंडलीत गुरु चांडाल योग तयार होतो. ज्योतिष शास्त्रानुसार सांगायचे झाले तर हा सर्वात घातक योग आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत हा योग तयार झाला तर त्याला खूप मोठा आर्थिक फटका बसतो.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्यावेळी एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु चांडाल योग तयार होत असतो त्यावेळी त्या व्यक्तीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच त्या व्यक्तीच्या मनात सतत नकारात्मक विचार येतात.ज्योतिष शास्त्रानुसार ज्यावेळी कुंडलीत गुरु चांडाळ योग तयार होत असतो.

त्यावेळी व्यक्तीला अनेक प्रकारच्या गैरसोयींचा सामना करावा लागतो. तसेच त्याला कठोर परिश्रम करून अपयश येण्याची शक्यता असते. जाणून घेऊया कुंडलीत गुरु चांडाल योग कसा बनतो आणि त्याची लक्षणे काय काय असतात.

असा तयार होतो चांडाल योग

ज्योतिष शास्त्रानुसार सांगायचे झाले तर अशा ग्रहांच्या संयोगामुळे एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरु चांडाल योग तयार होत असतो, ज्याला प्रत्येकजण टाळण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच गुरु चांडाल योगाचे वर्णन अतिशय अशुभ योग म्हणून केले असून कुंडलीतील गुरु चांडाल योग हा खूप अशुभ ग्रह राहू आणि बुद्धीचा देवता गुरु ग्रह यांच्या संयोगाने तयार होत असतो.

हे लक्षात घ्या की, गुरु चांडाल योगामुळे व्यक्तीच्या जीवनावर खूप नकारात्मक प्रभाव पडत असतो. त्यामुळे जीवनात अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. इतकेच नाही तर त्याच्यावर अनेक संकटे येतात. तसेच त्या व्यक्तीचे चारित्र्य सतत बदनाम होत असते. चुकीच्या कलंकामुळे तो खूप त्रासलेला असतो. त्या व्यक्तीला मित्र, कुटुंब, जमीन यांचे सौभाग्य प्राप्त होत नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe