Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदार, खासदार गुवाहाटीला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी कामाख्या देवीचे दर्शन आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिले असल्याचे सांगितले आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विमानतळावर पोहोचताच विरोधकांना चपराक लगावला आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून कामाख्या देवीला कोणाचा बळी देणार असा टोमणा मारला होता त्यालाच प्रत्युत्तर देताना शिंदे यांनी अजित पवारांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही देवीचे भक्त आहोत. त्यामुळे देवीच्या दर्शनासाठी आलो आहोत. कामाख्या देवी कडक आणि जागृत आहे. याची परिचिती सर्वांना आलीच असेल. त्यामुळे विरोधकांनी जपून बोलावे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.
आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं होतं. त्यांच्या निमंत्रणामुळेच आम्ही गुवाहाटीला आल्याचेही एकनाथ शिंदे यांनी स्प्ष्ट केले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांना पाहण्यासाठी विमानतळावर अंकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आणि त्यांचे सहकारी आमदार यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी करण्यात आली होती. विमानतळावर आसाम सरकारच्या तीन मंत्र्यांनी शिंदे आणि इतर आमदारांचे स्वागत केले.
त्यावेळी विमानतळावर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. ते म्हणाले, आम्ही श्रद्धेने आणि भक्तीभावाने कामाख्या देवीच्या दर्शनासाठी आलो आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिले.
आम्ही दर्शनाला आलोय. सर्वांच्या मनात दर्शनाला यायचे होते. पूर्वी आलो होतो. तेव्हा धावपळ झाली होती. त्यामुळे पुन्हा दर्शनाला जाण्याची सर्वांची इच्छा होती. त्यानसुार आज निवांत आलो, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.