कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगामाला होणार ‘या’ दिवसापासून सुरुवात; वाचा महत्वाची अपडेट

Published on -

Ahilyanagar News:- अहिल्यानगर जिल्हा म्हटला म्हणजे साखर कारखान्यांचा आणि सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणारा जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असून या ठिकाणी सर्वाधिक साखर कारखाने आहेत. सध्याचा कालावधी विधानसभा निवडणुकांचा जरी असला तरी देखील कारखान्यांचा गाळप हंगामाला देखील आता काही दिवसांनी सुरुवात होणारी आहे.

या हंगामामध्ये तसे पाहायला गेले तर उशिराच कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होत आहे. परंतु यामध्ये महत्वाची अपडेट जर बघितली तर ऊस उत्पादकांना महत्त्वाचा असलेला व कोपरगाव तालुकाच नाही तर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देणारा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचा 70 वा गळीत हंगामाचा शुभारंभ दिनांक 8 नोव्हेंबर 2024 म्हणजे शुक्रवारी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आला आहे व यासंबंधीची माहिती कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ होणार शुक्रवारी
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहिल्यानगर जिल्हा आणि कोपरगाव तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वाधिक दर देण्यास प्रसिद्ध असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या 70 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ आठ नोव्हेंबर 2024 म्हणजे शुक्रवारी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आला

असल्याचे महत्वपूर्ण माहिती या कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे. सध्या जर आपण या सहकारी साखर कारखान्याचे स्थिती पाहिली तर या कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मा. आ. अशोकराव काळे यांचे मार्गदर्शन व आमदार आशुतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगले काम करत असून या कारखान्याने प्रगतीची अनेक शिखरे गाठली आहेत.

यावर्षी देखील दरवर्षीप्रमाणे गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात पार पडणार आहे. कारखान्याचे मार्गदर्शक मा. आ. अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात येणार आहे.

तरी या गळीत हंगामाच्या सोहळ्याच्या शुभारंभ प्रसंगी सर्व ऊस उत्पादक शेतकरी सभासद वर्ग व सर्व हितचिंतक व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe