परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवा !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-राज्यातील शाळा नोव्हेंबरमध्ये टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

त्यानुसार शाळा सुरु देखील केल्या मात्र पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. यामुळे शाळा प्रशासन एक महत्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार 1 मार्चपासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा,

असे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात येत असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

नगरमध्येही करोनाची आकडेवारी वाढते आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

आता फेब्रुवारी महिन्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता आणि विद्यार्थ्यांना होणारी करोनाची बाधा पाहता

स्थानिक प्रशासनाने परिस्थिती पाहून एक मार्चपासून शाळा काही काळासाठी बंद ठेवण्यासाठीचा निर्णय घ्यायचा असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने जिल्हावार माहिती संकलीत करण्यास सुरूवात केली आहे.

मात्र स्थानिक पातळीवर परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा अशी सूचना मंत्री गायकवाड यांनी केली आहे.

विद्यार्थी व शिक्षक यांची सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य आहे. ज्या शाळांमध्ये करोना प्रादुर्भाव आढळून आला आहे,

तिथे आवश्यक स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक प्रशासनास सूचना देण्यात आल्या असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe