Upcoming SUV : भारतीय बाजारात सध्या SUV ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे कार निर्माता कंपन्याही भारतीय बाजारपेठेत शानदार फीचर्स असणाऱ्या SUV लाँच करत आहेत. अशातच जर तुम्हीही नवीन SUV खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
कारण लवकरच शानदार SUV भारतीय बाजारपेठेत येणार आहेत. त्यामुळे तुम्ही नवीन SUV खरेदी करणार असाल तर थोडे थांबा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे SUV ची किंमत 15 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. या SUV कधी लाँच होणार? कोणत्या SUV लाँच होणार आहेत? पाहुयात सविस्तर.
मारुती फ्रॉन्क्स
भारतीय बाजारपेठेत मारुती फ्रॉन्क्स1.2L ड्युअल जेट आणि 1.0L टर्बो पेट्रोल इंजिनसह येणार आहे. या कारची किंमत सुमारे 8 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ती 15 एप्रिल रोजी बाजारात दाखल होणार आहे.
महिंद्रा बोलेरो निओ प्लस
महिंद्रा या दिग्ग्ज कार कंपनीची आगामी कार दोन आसन पर्यायांमध्ये सादर करण्यात येणार आहे – 7 आणि 9 जागा. हे मॉडेल बोलेरो निओपेक्षा मोठे असू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. कंपनी ही कार 5 मे रोजी लॉन्च करू शकते. त्याची संभाव्य किंमत सुमारे 10 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.
सुझुकी जिमनी
ग्राहक अनेक वर्षांपासून या कारची वाट पाहत होते. कंपनीच्या या SUV मध्ये 9.0-इंच टचस्क्रीन स्मार्टप्ले प्रो प्लस इन्फोटेनमेंट, क्लायमेट कंट्रोल, Arkamys, वॉशर्ससह एलईडी हेडलॅम्प, बॉडी-रंगीत डोअर हँडल, अलॉय व्हील आणि क्रूझ कंट्रोल यांसारखी फीचर्स दिली आहेत.
कंपनी ही कार 15 मे रोजी लॉन्च करण्याची शक्यता आहे. तिची किंमत 12.70 लाख रुपये असेल. हे लक्षात घ्या की मारुती सुझुकी जिमनी फक्त Nexa शोरूममध्ये उपलब्ध असणार आहे. SUV दोन प्रकारात येईल – Zeta आणि Alpha. दोन्ही ट्रिम मॅन्युअल किंवा ऑटोमॅटिक पर्यायामध्ये उपलब्ध असतील. अहवालानुसार, मारुती सुझुकीला अल्फाला मोठी मागणी आली आहे आणि ते प्रथम टॉप ट्रिम रोल आउट करण्यावर लक्ष केंद्रित करेल.