Kia EV9 : आता कियांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुमचे बजेट तयार ठेवा कारण आता लवकरच कंपनीची Kia EV9 कार लाँच होणार आहे. कंपनीच्या इतर कार्सप्रमाणे ही कारदेखील मार्केटमध्ये धुमाकूळ घालेल, यात काही शंकाच नाही.
नुकत्याच पार पडलेल्या ऑटो एक्स्पो 2023 इव्हेंटमध्ये इतर दिग्ग्ज कंपन्यांसह कियानेही आपली कार सादर केली होती. अशातच कियानेही आपली Kia EV9 ही कार सादर केली होती. आता ही कार लाँच होणार आहे परंतु, त्याआधी तिचे डिटेल्स लीक झाले आहेत.
मीडियाने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, कंपनीची कार असलेल्या अनेक ग्राहकांना एक सर्वेक्षण पाठवले होते, ज्यात Kia EV9 च्या प्रोडक्शन व्हर्जनच्या पाच ट्रिम्स सूचीबद्ध केल्या होत्या. या सर्वेक्षणात, कंपनीने कार मालकांना असे विचारले की जर त्यांना इलेक्ट्रिक एसयूव्ही घ्यायची असल्यास तर ते यापैकी कोणाला प्राधान्य देतील.
सर्वेक्षणात सूचीबद्ध केलेल्या ट्रिम्सनुसार या नवीन कारची किंमत $56,000 किंवा सुमारे 46 लाख रुपये इतकी आहे. ते 200 hp पॉवर आणि 338 Nm टॉर्क जनरेट करेल आणि सुमारे 350 किमीची रेंज देईल.
टॉप-ऑफ-द-लाइन नवीन कारची किंमत एकूण $73,000 किंवा सुमारे 60 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. 400 hp आणि 652 Nm टॉर्क आउटपुटसह सुमारे 386 किमीची श्रेणी देईल. यात 21 इंची अलॉय व्हील्स कंपनीकडून देण्यात येतील. तर खालच्या ट्रिमला ट्रिमवर अवलंबून 19 किंवा 20-इंच चाके मिळतील.
कारची शीर्ष ट्रिम खूप जलद असेल. फक्त 5.2 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग वाढवू शकते. इतर ट्रिम 6 सेकंद ते 8.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठू शकते.
हे लक्षात घ्या की कंपनीने या आकडेवारीची अधिकृत घोषणा किंवा पुष्टी केली नाही. कंपनीचे हे मॉडेल मर्सिडीज ईक्यूबीशी स्पर्धा करेल, ज्याची किंमत जवळजवळ समान आहे, परंतु ती शक्तिशाली नाही. ही कार यूएसच्या मार्केटमध्ये 2023 च्या पहिल्या तिमाहीत होऊ शकते.