बालगृहातील अल्पवयीन मुलास पळविले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 जानेवारी 2022 :-  केडगाव येथील सावली प्रतिष्ठान संचलित सावली बालगृहात राहणार्‍या जाकीर शाहीद अन्सारी (वय 17 मूळ रा. सागर नाश्ता सेंटर, श्रीरामपूर) यास अज्ञात व्यक्तीने पळून नेले आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाकीर अन्सारी 18 सप्टेंबर 2021 रोजी सावली बालगृहात दाखल झाला होता.

3 जानेवारी 2022 रोजी बालगृहातील काळजीवाहक अंबिका शामल यांनी सांगितले की, जाकीर अन्सारी हा मुलगा बालगृहात दिसून येत नाही.

त्यानंतर त्याचा बालगृह परिसर, केडगाव, रेल्वेस्टेशन, बसस्थानक परिसरात शोध घेतला असता तो मिळून आला नाही.

यानंतर संस्थेचे अधीक्षक अजिंक्य दिलीप आंधळे यांच्या फिर्यादीनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe