Kidney Disease : किडनीचे नुकसान टाळायचे असेल तर आजच आहारातून ‘हे’ पदार्थ वगळा अन्यथा भोगावे लागतील परिणाम

Kidney Disease : रक्तातील नको असणारे घटक काढून रक्त शुद्ध करण्याचे महत्त्वाचे काम हे किडनी (Kidney) करत असते. त्यामुळे शरीरातील किडनी हा महत्त्वाचा अवयव आहे. किडनीमध्ये थोडी जरी समस्या (Kidney Disease) आली तरी आपल्या शरीरातील कार्य प्रणालीवर याचा परिमाण होतो.

बदलती जीवनशैली (Lifestyle), खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे (Bad Diet) आरोग्यावरही (Health) मोठे परिणाम होतात. कित्येक अन्नपदार्थांमुळे सर्वाधिक नुकसान आपल्या किडनीचे (Kidney Health Diet) होते. या पदार्थांमुळे किडनीवर होणारे परिणाम आपल्याला सहजासहजी लगचेच दिसून येत नाहीत. त्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.

मधुमेहामुळे मूत्रपिंडाचे नुकसान कसे होते?

जर रक्तातील साखरेची पातळी (Diabetes) नियंत्रणाबाहेर गेली तर हळूहळू किडनीमध्ये असलेल्या रक्तवाहिन्यांचा (Blood vessels) समूह खराब होतो. जेव्हा या रक्तवाहिन्या कमकुवत होऊ लागतात, तेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या रक्त स्वच्छ करू शकत नाही. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या सुरू होते आणि किडनीही खराब होऊ शकते.

किडनी वाचवण्यासाठी साखरेची पातळी नियंत्रित ठेवा

आरोग्य तज्ज्ञांच्या मते किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाने साखर नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी आपल्या जीवनशैलीत अनेक बदल घडवून आणले पाहिजेत, जसे की-

  • जेवणाची विशेष काळजी घ्या.
  • राग कमी करा.
  • तणाव घेऊ नका.
  • नियमित व्यायाम करा.
  • रोजयोगासने करा.
  • रक्तदाबाची समस्या असेल तर नियंत्रणात ठेवा.
  • दिर्घकाळापासून पोटदुखीचा त्रास होत असेल तर तपासणी करा.
  • सोनोग्राफी करा आणि IgA नेफ्रोपॅथी चाचणी करा

किडनीच्या समस्येत या पदार्थांपासून अंतर ठेवा

– जास्त मीठ खाऊ नका.
– जास्त पोटॅशियम असलेल्या भाज्यांपासून दूर राहा. (उदा.- बटाटा, टोमॅटो, किवी, संत्री, एवोकॅडो)
– दूध, दही आणि चीजपासून अंतर ठेवा. कारण त्यात फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते.
– डबाबंद वस्तूंचे सेवन करू नका.
– लोणचे, सुकी मासे आणि शीतपेयांचे सेवन करू नका.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe