पुण्यात किडनी रॅकेट उघडकीस, नामांकित हॉस्पिटलविरूद्ध गुन्हा

Ahmednagarlive24 office
Published:

Maharashtra news : पुण्यात गेल्या महिन्यात उघडकीस आलेल्या किडीन प्रत्यारोपण प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून आता ही प्रक्रिया करणाऱ्या रूबी क्लिनिकचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. परवेज ग्रॅंट यांच्यासह १५ जणांवर कोरेगाव पार्क पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापूर येथील एका महिलेला १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून तिच्यावर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, तिला पैसे मिळालेच नाही. त्यामुळे तिने एजंटाविरूद्ध पोलिसांमध्ये लगेल्या महिन्यात तक्रार दिली होती.

याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी कागदपत्रांची छाननी केली. त्यावेळी हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. कागदपत्रांची खात्री न करता दिशाभूल करून किडनी बदलली गेली असल्याचे तपासाच उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी आता ती महिला, तिला आमिष दाखविणारे एजंट आणि रुबी हॉल मधील डॉक्टर अशा पंधरा जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.


यातील पिडित महिला सारिका सुतार या कोल्हापूरच्या रहिवासी आहेत. त्यांच्या पतीचे १८ वर्षांपूर्वी निधन झाले. घरी दोन मुले आहेत. थोरला २३ वर्षांचा मुलगा कर्णबधीर आहे, तर दुसरा २२ वर्षांचा मुलगा छोटी मोठी कामे करतो.

सारिका अशिक्षित आहेत. कोल्हापूरमध्ये हॉटेलमध्ये भांडी घासण्याचे त्या काम करायच्या. एका एजंटने त्यांनी गरजू व्यक्तीला किडनी दिली, तर १५ लाख रुपये देऊ असे सांगितले होते. प्रत्यक्षात ऑपरेशन झाल्यानंतर त्याने साडेचार लाख रुपये दिले.

१५ लाखांची बोलणी झालेली असताना एजंट साडेचार लाख रुपये देत असल्याने सारिका यांच्या बहिणीने पैसे घेतले नाहीत. त्यांनी १५ लाखांची मागणी केल्यानंतर एजंट फरार झाला.ही सगळी घटना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये घडली

याप्रकणी सारिका यांनी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तर रुबी हॉल क्लिनिककडून देखील पोलिसांना पत्र लिहीत या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांच्या चौकशीत मोठे रॅकेट उघडकीस आले आणि त्या महिलेसह हॉस्पिटलही यामध्ये अडकले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe