अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा स्थगित झालेल्या बारामती दौरा येत्या बुधवारी होणार आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांचे तत्कालीन सहायक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या येथील मालमत्तेची पाहणी करण्यासाठी ते बारामतीत येणार आहेत.
यावेळी सोमैय्या यांच्यासोबत आ. गोपीचंद पडळकर देखील सहभागी होत असल्याने उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याबाबतही काही नवे आरोप केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी बारामतीचा दौरा जाहीर केला होता. परंतु ऐनवेळी तो स्थगित झाला. त्यानंतर सोमय्या यांनी नुकताच कोल्हापूर दौरा करत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले.
पारनेर कारखान्यासंबंधी त्यांनी केलेल्या आरोपांना शनिवारी (दि. २) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा नामोल्लेख न करता उत्तर दिले.आता बारामती दौऱ्यात त्याबद्दल सोमय्या काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.
त्यांच्यासोबत आमदार गोपिचंद पडळकर हे ही दौऱ्यात सहभागी असणार आहेत. त्यामुळे सोमैय्या पवारांवर नवे आरोप करण्याची शक्यता व्यक्त होते आहे. खरमाटे यांच्या मालमत्तेची पाहणी केल्यानंतर हे दोघे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम