Kisan Vikash Patra : जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. अशातच सरकारची एक योजना असून तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला तिचा चांगला फायदा मिळत आहे. ही सरकारी योजना तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या महिन्यापासून म्हणजेच 1 एप्रिलपासून केंद्र सरकारने स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममधील व्याजदरात वाढ केली आहे. यापैकी एक म्हणजे किसान विकास पत्र योजना होय. जर तुम्ही या योजनेत गुंतवणुक केली तर तुम्हाला एकाच वर्षात डबल पैसे मिळत आहेत.
किती आहे सध्याचा व्याज दर?
हे लक्षात घ्या की स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये, व्याज दर दर तीन महिन्यांनी म्हणजे त्रैमासिक आधारावर निश्चित करण्यात येते. या महिन्यात म्हणजे 1 एप्रिल 2023 रोजी, सरकारकडून किसान विकास पत्रात उपलब्ध असणाऱ्या व्याजदरात 30 आधार अंकांची वाढ करण्यात आली आहे. सध्या त्यावर वार्षिक आधारावर 7.5 टक्के दराने व्याज मिळत आहे.
जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या योजनेत रु. 1,000 ची गुंतवणूक सुरू करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात कमाल गुंतवणुक मर्यादा निश्चित करण्यात आली नाही. या योजनेतील तुमची गुंतवणूक रक्कम सध्याच्या व्याजदरानुसार 115 महिन्यांत दुप्पट होते.
करात सूट मिळते?
दिलेल्या माहितीनुसार, किसान विकास पत्र योजना आयकर कायदा 1961 अंतर्गत येते. त्यामुळे यात 80C अंतर्गत कर सूट दिली जाते. समजा जर तुम्ही या योजनेत 50,000 रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास तुम्हाला तुमचे पॅन कार्ड तपशील शेअर करावे लागणार आहेत. तसेच तुम्ही हमी म्हणून या योजनेचा वापर करून कर्ज घेऊ शकता.
काय आहे किसान विकास पत्राचा इतिहास ?
ही योजना भारतीय पोस्ट ऑफिसने 1988 मध्ये सुरू केली आहे. भारत सरकारने ही योजना देशातील लहान बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच गुंतवणूकदारांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणली होती. ही योजना सुरू झाल्यापासून खूप लोकप्रिय झाली असली तरी 2011 मध्ये सरकारच्या लक्षात आले की या योजनेचा मनी लॉन्ड्रिंगसाठी गैरवापर करण्यात येऊ शकतो.
2014 मध्ये या योजनेची पुन्हा एकदा अनेक बदलांसह नव्याने सुरूवात करण्यात आली. या बदलांमध्ये एकाचवेळी 50 हजारांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी पॅनकार्ड आवश्यक केले आहे. तसेच 10 लाखांपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी उत्पन्नाच्या स्रोताचा पुरावा अनिवार्य केला आहे.