Banking Tips : नॉमिनी नसतानाही मृत व्यक्तीच्या खात्यातुन पैसे काढता येतात, कसं ते जाणून घ्या

Ahmednagarlive24 office
Published:

Banking Tips : बँक खात्यात तुम्ही तुमचे पैसे ठेवता येतात. त्याशिवाय या पैशांवर बँकेकडून व्याजही दिले जाते. परंतु तुम्ही कधी असा विचार केला आहे का की जर बँकेत पैसे असणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या पैशांचे काय होते?

त्याशिवाय त्या व्यक्तीला कोणीही नॉमिनी नसेल तर त्या पैशांचे काय होते? या सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.

असे काढा पैसे

जर तुमच्‍या खात्‍यामध्‍ये नॉमिनी जोडले असेल आणि तुमचा काही कारणास्तव मृत्यू झाला तर नॉमिनीला दोन साक्षीदारांसह बँकेत जावे लागते . त्याशिवाय खातेदाराचे मृत्यू प्रमाणपत्रही जोडावे लागते. त्यानंतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नॉमिनीला पैसे दिले जातात.

जर नॉमिनी नसेल तर काय करावे?

स्टेप 1

जर खातेधारकाचा मृत्यू झाला आणि त्या खात्यात कोणीही नॉमिनी नसेल. तर तुम्हाला पैसे मिळू मिळतील, परंतु यासाठी तुम्हाला कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागेल. त्यानंतर ते पैसे दिले जातात.

स्टेप 2

मृत व्यक्तीच्या बँक खात्यांमध्ये पैशांचा दावा करणाऱ्या व्यक्तीला इच्छापत्र किंवा उत्तराधिकार प्रमाणपत्र त्या बँकेला दाखवावे लागते. त्यानंतर पैसे चुकीच्या हातात जाऊ नये म्हणून त्या बँकेतर्फे तपास केला जातो.

तपासादरम्यान बँक तुमच्याकडून कागदपत्रे मागते आणि नंतर दावा योग्य असेल तर पैसे मिळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe