अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- संपूर्ण देशात रोखीचे व्यवहार अधिक नजरेस पडतात, रोखीच्या व्यवहारात सर्वात जास्त नोटांचा वापर होतो. व्यवहार करताना अनेकदा आपल्याकडे फाटलेली नोट येते किंवा आपल्या हातून चुकून नोट फाटून जाते.
जर आपल्या कडेही अशा प्रकारच्या फाटलेल्या नोटा असतील तर चिंता करू नका आता फाटलेल्या नोटा देखील बँकेद्वारे बदलता येऊ शकतात यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने नियम बनवलेले आहेत.
नोटा बदलण्यासाठी RBI ने केला ‘हा’ नियम – तुम्ही RBI कार्यालयात किंवा अधिकृत बँक शाखांमध्ये नोटा बदलू शकता. नोटा बदलण्यासाठी बँका तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारू शकत नाहीत.
परंतु, एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून नोट जाळली किंवा खराब केली असेल, तर बँक नोट बदलण्यास नकार देऊ शकते.
जर 2000 च्या नोटेची लांबी 88cm असेल तर तुम्हाला त्याचे पूर्ण पैसे मिळतील. दुसरीकडे, जर तुमच्याकडे नोटेचा यापेक्षा कमी तुकडा असेल तर, तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटेऐवजी फक्त 1000 रुपये मिळतील.
याशिवाय जर एटीएममधून खराब नोट निघाली असेल तर तुम्ही एटीएम व्यवहाराचा पुरावा दाखवून नोट बदलू शकता. पुरावा म्हणून, बँक एटीएम मशीनमधून संदेश किंवा चिट दाखवू शकते. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.
ओल्या नोट्स संबंधित नियम – जर लोक सहसा ओल्या नोटला वाळवतात आणि नंतर वापरतात. पण, नोटेचा रंग खराब झाला असेल, तर तुम्ही ती नोट बँकेत बदलून घेऊ शकता. परंतु, लक्षात ठेवा नोट बँकेत बदलण्यासाठी, त्यात छापलेले अंक स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहेत.