कोल्हापूर : काही दिवसांपासून कोल्हापूर (Kolhapur) उत्तर मतदार संघाची (North constituency) पोटनिवडणूकचे (By-election) वारे राज्यात वाहत आहे. निवडणूक झाली असून आज त्या निवडणुकीचा निकाल (Election Result) लागणार आहे. या ठिकणी भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार उभे राहिलेले आहेत. आता या दोघांमध्ये चुरशीची लढत झाली असून कोण जिंकणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
काँग्रेसच्या (Congress) जयश्री जाधव (Jayashree jadhav) आणि त्यांच्या विरुद्ध भाजपचे सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) अशा या दोन नेत्यांची प्रतिष्ठा तसेच पक्षाचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी या मतदार संघात जोरदार लढत केली आहे. तसेच काँग्रेस आणि महाविकास आघाडीने देखील या मतदार संघात जोरदार प्रयत्न केले आहेत.
थोड्याच वेळात या निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. राजाराम तलावा शेजारील शासकीय गोदामात ही मतमोजणी सुरु आहे. 16 टेबल आणि 26 फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी पार पडणार आहे.
12 एप्रिल रोजी या जागेसाठी मतदान पार पडले आहे. 61.19 टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव आणि भाजपचे सत्यजित कदम यांच्यासह १५ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकीवरून वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले आहे. महाविकास आघडी विरुद्ध भाजप असे राजकारण पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण डंका मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.