कोपरगावचा लाचखोर तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- वाळूच्या वाहनावर कारवाई न करण्यासाठी लाच मागून ती स्वीकारणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथील तालाठ्यालानाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

सुशीलराजेंद्र शुक्ला (वय 33 वर्षे), असे त्या लाचखोर तालाठ्याचे नाव आहे. विशेषबाब म्हणजे या पूर्वीही कोपरगाव तालुक्यात तीन तलाठी या विभागाने गतवर्षी जेरबंद केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव येथील एका इसमाकडून त्याचे वाळूचोरीत सापडलेले वाहन सोडण्यासाठी 68 हजार रुपये रकमेची मागणी धोत्रे येथील तलाठी सुशील शुक्ला याने केली होती.

त्या नंतर तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभाग नाशिक यांचेकडे तक्रार केली होती. त्या प्रमाणे लाचलुचपत विभागाने तलाठ्याला पकडण्यासाठी सापळा लावला होता.

त्यानुसार त्यांनी तक्रारदाराने या तलाठ्याकडे तडजोड रक्कम म्हणून 28 हजार रुपये ठरवले होते व ती रोख 28 हजारांची प्रक्रिया केलेली रक्कम लाचलुचपत विभागाने तक्रारदाराकडे सुपूर्त केली होती.

ही रक्कम स्वीकारताना तलाठी पंचासमक्ष पकडला गेला आहे. दरम्यान नाशिक येथील लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांनी ही कारवाई केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe