KTM Adventure 390 : काही दिवसांपूर्वी KTM ने आपली KTM Adventure 390 स्पोर्ट्स बाईक लाँच केली होती. जर किमतीचा विचार केला तर या बाइकची किंमत एक्स-शोरूम किंमत सुमारे 2,80,652 रुपये इतकी आहे. जी ऑन-रोड 3,25,346 रुपयांपर्यंत जाते.
जर तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. कारण तुम्ही आता ही बाईक अवघ्या 30 हजारात घरी आणू शकता. यामुळे तुमची लाखो रुपयांची बचत होईल. इतकेच नाही तर तुम्हाला कमी किमतीत शानदार फीचर्स असणारी बाईक खरेदी करता येईल.
जाणून घ्या फायनान्स प्लॅन
या बाईकची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 2,80,652 रुपये इतकी आहे. जी ऑन-रोड 3,25,346 रुपयांपर्यंत पोहोचते. परंतु, ही बाईक तुम्हाला खरेदी करायची असेल तर कंपनीकडून तुम्हाला अतिशय सुलभ फायनान्स प्लॅन देण्यात येत आहे. या प्लॅन अंतर्गत, तुम्हाला केवळ 30,000 रुपयांचे डाऊन पेमेंट करून ही बाईक त्यांच्या घरी नेता येईल.
EMI कॅल्क्युलेटरनुसार, KTM 390 Adventure बाइक खरेदी करण्यासाठी बँक तुम्हाला 9.7 टक्के वार्षिक व्याजदराने 2,95,346 रुपयांचे कर्ज देते. तुम्हाला त्यासाठी 30 हजार रुपये कंपनीकडे डाऊन पेमेंट म्हणून जमा करून ही बाईक खरेदी करता येऊ शकते. बँकेकडून ही बाईक खरेदी करण्यासाठी 3 वर्षांसाठी कर्ज उपलब्ध असून या काळात प्रत्येक महिन्याला 9,488 रुपयांची EMI बँकेत जमा करावी लागणार आहे.
इंजिन
कंपनीकडून या बाईकमध्ये खूप पॉवरफुल इंजिन देण्यात येत आहे. हे सिंगल सिलेंडर 373 सीसी इंजिनद्वारे समर्थित असून ते ३७ एनएम पीक टॉर्कसह ४३.५ बीएचपी कमाल पॉवर निर्माण करते. यात कंपनीकडून 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सही देण्यात येत आहे. कंपनीची ही बाइक एका लिटर पेट्रोलमध्ये 30 किलोमीटरपर्यंत धावेल असा दावा कंपनीने केला आहे.