अहमदनगर Live24 टीम, 30 जुलै 2021 :- आनंदी आयुष्यासाठी सेक्स हा एक महत्त्वाचा भाग असतो. सुखद आणि प्रसन्न सेक्ससाठी ऊर्जा देखील गरजेची असते.
परन्तु सेक्सच्या आनंदनंतर महिलांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही आपल्या पार्टनरसोबत कधी, कोणत्या वेळेस सेक्स करत आहात, यानं फारसा फरक पडत नाही.
पण सेक्स केल्यानंतर कदाचित त्याच चुका वारंवार केल्यास त्यांच्या गंभीर दुष्परिणामांना तुम्हाला सामोरं जावं लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.
सेक्सदरम्यान काही ठराविक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे तितकीच काळजी सेक्सनंतरही घेणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊयात त्याबद्दल –
सेक्सनंतर मूत्रविर्सजन न करणे:- सेक्सनंतर महिला वा पुरुष मूत्रविर्सजनाला जाणे टाळतात. शरीर थकल्यामुळे ते लघवीला जाण्याचा कंटाळा करतात.
मात्र असे करु नका. कारण सेक्स दरम्यान कोणते विषाणू वा किटाणू शरीरात गेले असतील तर लघवीद्वारे बाहेर पडतात. म्हणून मूत्रविर्सजनाला जाणे गरजेचे आहे.
आपल्या गुप्तांगांवर ओल्या वाइप्सचा उपयोग करणे:- सेक्सनंतर आपल्या योनीमार्गाची स्वच्छता गरजेची आहे. मात्र त्यासाठी महिलांनी सेक्सनंतर ओल्या वाइप्सचा वापर टाळावा. कारण त्यात केमिकल असतात.
योनी स्वच्छ करण्यासाठी साबणचा वापर :- योनी स्वच्छ करण्यासाठी बहुतांश जणी साबणाचा वापर करतात. साबणचा वापर करणाऱ्या महिलांनी ही सवय सोडणं गरजेचं आहे.
योनीमध्ये नैसर्गिक ल्युब्रिकेशन असते. जे योनी मार्गामध्ये नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवण्याचे कार्य करते. जर तुम्ही योनी मार्ग स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करत असाल तर नैसर्गिक ल्युब्रिकेशनवर दुष्परिणाम होतात.
परिणामी योनी मार्गातील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवणे कठीण होते. नंतर कदाचित सेक्स करताना तुम्हाला त्रासही होऊ शकतो.
सेक्सदरम्यान वापरलेल्या कपड्यांमध्येच झोपणे :- सेक्सनंतर काही जणांना थकवा जाणवतो, ही बाब सामान्य आहे. थकवा आल्यानं अंथरुणात लोळत राहण्याची इच्छा होते किंवा गाढ झोप लागते.
सेक्सनंतर झोपणे किंवा लोळत राहणं चूक नाही. पण सेक्सदरम्यान अंगावर असलेले कपडेच पुन्हा वापरणं टाळा. सेक्स करताना आपल्याला शरीराला भरपूर प्रमाणात घाम येतो.
घामानं भिजलेले कपडे पुन्हा वापरल्यास संसर्ग होण्याची भीती असते. सेक्सदरम्यान वापरलेले कपडे देखील स्वच्छ धुणे गरजेचं आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम