Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर चा हप्ता कधीपर्यंत जमा होणार या संदर्भात एक नवीन अपडेट हाती आली आहे.
खरे तर लाडक्या बहिणींना अलीकडे सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे. सप्टेंबर चा हप्ता ऑक्टोबर महिन्यात वर्ग झाला आहे. यामुळे ऑक्टोबरचा हप्ता नोव्हेंबर मध्ये मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण लाडक्या बहिणींसाठी एका दिलासादायक बातमी आहे.

ती म्हणजे ऑक्टोबर चा हप्ता हा नोव्हेंबर मध्ये नाही तर या महिन्यातच जमा होईल अशी शक्यता आहे. लाडकी बहिण योजना ही गेल्या शिंदे सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा हप्ता दिला जातोय.
अर्थात, एका वर्षात पात्र ठरणाऱ्या लाभार्थी महिलांना या योजनेच्या माध्यमातून 18 हजार रुपयांचा लाभ वर्ग करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत एकूण 15 हप्ते वर्ग करण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे येत्या काही दिवसांनी या योजनेचा सोळावा हप्ता देखील लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लाडक्या बहिणींना पुढील आठवड्यात या योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा लाभ दिला जाईल. गेल्या वर्षी संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींमुळे महायुतीला चांगले यश मिळाले आहे आणि आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना मोठी भेट दिली जाऊ शकते.
राज्य शासनाकडून पुढील आठवड्यात ऑक्टोबर महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली होती. या प्रक्रियेसाठी शासनाकडून दोन महिन्याची मुदत देण्यात आली होती.
विशेष म्हणजे पूरग्रस्त जिल्ह्यातील महिलांना पंधरा दिवस अतिरिक्त मुदतही देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान आता या योजनेच्या पात्र महिलांसाठी शासनाने ई-केवायसीची