अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2021 :- पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे आसवानी प्रकल्पाचे माँलेशचचे पाणी प्रवरा नदीच्या पाञाञ सोडल्यामुळे प्रवरा नदीतील पाणी दुषित होवून लाखो मासे मृत्यूमुखी पडले तर नदी काटचे पिण्याचे पाणी दुषित झाले आहे.
या प्रदूषणामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने चौकशी करून कारवाई करणे बाबत दादासाहेब पवार यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात पवार यांनी म्हटले आहे की, प्रवरा कारखाना परिसर व प्रवरा नदीकाठी पाहणी केली असता असे आढळून आले की, डॉ . प.वि.वि. पा . सह . साखर कारखान्याच्या स्पेंट वाश प्रवरा नदी पाञात सोडलेले असल्याने नदी पाञातील लाखो माशे मृत्यूमुखी पडले आहे.तसेच पाणी प्रदुषित झाल्याने पाण्याची दुर्गंधी सुटली आहे.
मृत माशे खाल्याने श्वान ( कुत्रे ) मृत्युमुखी पडले आहे. या पुर्वी कारखान्याने प्रवर नदीमध्ये स्पेंट वाश सोडून पाणी प्रदूषित केले होते. त्यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे तक्रार केली असता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारखान्याला एक लाख पन्नास हजार रुपये दंड ठोठवला आहे.
पवार यांनी पुढे सांगितले की, साधारण ११ महिन्यापूर्वी कडीत मांडवे बंधाऱ्यात लाखो माशे मेले होते.त्याचे वृत्त प्रसार माध्यमांनी प्रसिद्ध केले होते.त्यावेळी कारखान्या विरोधात तक्रार केली होती. परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दंड आकारण्या व्यतिरिक्त कोणतीही कारवाई केली नाही.
राहुरी व श्रीरामपूर तालुक्यातील गावांना या दुषित पाण्याचा फटका बसला आहे. राहुरी तालुक्यातील खुडसरगाव, माहेगाव, मालुंजा खुर्द, पाथरे महालगाव, दरडगाव, लाख, महाडूक सेंटर शेवनवाडगांव, कोपरे, केसापुर तर श्रीरामपुर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक, भेर्डापुर, लाडगाव, मालुंजा खु. या दोन्ही तालुक्यातील गावांना बसला आहे. प्रवरा नदी वरील बंधाऱ्यात मृत्यूमुखी पडलेल्या माशांचा पाण्यावर तवंग दिसत आहे.
तर मृत मासे खाल्ल्याने पाळीव प्राण्याच्या जीवावर बेतले आहे. प्रवरा कारखान्याची प्रत्यक्ष पाहणी केली असता स्पेंट वाश हा तीन ते चार स्रोताद्वारे प्रवरा नदीपाञा मध्ये सोडलेले आहे. बंधाऱ्यांत साठलेल्या पाण्यात नदीपात्रात सोडलेले मळीयुक्त पाण्यामुळे बंधाऱ्यातील पाणी दुषित होवून पाण्यातील मासे मृत्यूमुखी पडले आहे. प्रवरा नदीपाञाचे पाणी पैठण येथिल नाथसागर जलाशयात जाते. या जलाशयातून अनेक जिल्ह्यांना पाणी पुरवठा केला जातो.
त्यामुळे अनेक जिल्ह्यांना प्रदुषित पाणी पुरवठा होतो.असे पवार यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी व औद्योगीकीकरणासाठी या पाण्याचा उपयोग केला जातो या पाण्यामुळे मानवी जीवनावर परिणाम होत आहे. या प्रदूषित पाण्याने गंभीर स्वरूपाचे आजार पसले आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . प्रवरा नदी राहुरी राहाता, श्रीरामपूर,नेवासा या तालुक्यातून प्रवाह जात आहे.
प्रवरा नदीपाञातुन अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत आहेत. नदीपात्राच्या लगत असणाऱ्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या उस तोडणी सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात उस तोडणी कामगार व नदीपात्रात मच्छिमार करणारे व्यावसायिक व शेतकऱ्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे.मळीयुक्त पाणी प्रवरा नदी पाञात सोडणाऱ्या प्रवरा कारखान्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांच्या वतीने निर्णय घेतला आहे.
प.डॉ.वि.वि. सह कारखाना आसवानी प्रकल्पामध्ये दोन पक्के लगुन व सहा कच्चे लगून असे आठ लगून आढळून आलेले आहेत. नियमानुसार ३० दिवस स्पेंट वाश साठेल जावू शकते. एका पक्क्या लगून व्यतिरिक्त इतर लगून मध्ये स्पेंट वाश साठून ठेवता येत नाही.प्रवरा कारखान्याने बेकायदेशीर रित्या सर्व लगून मध्ये स्पेंट वाश साठवलेला आढळून आला आहे.तसेच स्पेंट वाँश बेकायदेशीर पणे टँकरद्वारे व इतर स्रोतांमधून प्रवरा नदीपात्रात सोडताना आढळून आलेले आहे .
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या काही महिण्यापुर्वीच दिड लाखाचा दंड ठोठवला आहे.तरीही कारखान्याने वारंवार चुका करुन मानवी जीवनाशी खेळ खेळत आहे. पशु पक्षी यांच्या जीवनाशी पर्यावरणाचा समतोल ढासळला जात आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या कारखान्यावर जाणीवपूर्वक कारवाई करत नाहीत. कारखान्यामध्ये व आसवानी प्रकल्पात प्रदूषित पाण्याची विल्हेवाट लावण्याचे कुठलेही नियोजन नाही.
कारखान्याचे व्यवस्थापन राजकीय क्षेत्रातील असल्याने राजकीय दबावापोटी कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी पुढे येत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाने व केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा सामाजिक व पर्यावरणाच्या हिताच्या दृष्टीने न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात व हरित लवाद पुणे यांचेकडे दाद मागावी लागेल असे पवार यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम