Lakshmi Pujan : व्यापारीवर्गात लक्ष्मीपूजनाचे महत्त्व खूप आहे. देवी लक्ष्मीची पूजा, आकर्षक सजावट करुन फराळाचा नैवेद्य दाखवून लक्ष्मीपूजन साजरा (Celebrating Lakshmi Pujan) केले जाते.
वसुबारसेपासून (Vasubaras) सुरुवात झालेल्या दिवाळीची भाऊबीजेला (Bhau Beej) सांगता होते. जर तुम्हाला या दिवाळीत (Diwali 2022) देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर काही गोष्टी आवर्जून करा.

स्फटिकाची श्रीयंत्रे बाजारात उपलब्ध आहेत, एक खरेदी करा आणि यावेळी दीपावलीच्या दिवशी (Diwali in 2022) पंचामृत आणि गंगाजलाने स्नान करून उदबत्तीचा नैवेद्य अर्पण करा आणि देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप करा.
कमळाची माळ विकत घ्या आणि त्याच माळाने देवी लक्ष्मीचा जप करा, जर तुम्हाला नियमित वेळ मिळत नसेल, तर तुम्ही दर शुक्रवारी हे कराल तर लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल.
या दिवाळीपासून रोज सकाळी आणि संध्याकाळी घरांमध्ये देवाची पूजा करण्याचा नियम करा. ज्या घरांमध्ये सकाळ संध्याकाळ देवाची आरती होते, दिवा लावला जातो त्या घरांवर माता लक्ष्मी प्रसन्न होते.
घरातील अन्नधान्याचा अनादर करू नका. तुमची भूक आणि क्षमता असेल तितके बनवा आणि खा. ज्या घरांमध्ये अन्नधान्याचा आदर केला जात नाही आणि अन्नाच्या ताटात काही भाग शिल्लक राहतो, तिथे लक्ष्मीही थांबत नाही.