लेटेस्ट मुन्ना भाई… पोलीस भरतीच्या परीक्षेसाठी मास्कमध्ये बसवले इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2021 :- परीक्षा कोणतीही असो त्यात कॉपी करण्यासाठी प्रत्येकवेळा विद्यार्थी नवनवीन शक्कल लढवत असतात. नुकतेच असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस शिपाई भरती पूर्व लेखी परीक्षा आज पार पडली. परंतु, एका कॉपी बहाद्दराला पोलिसांनी गेटवरच पकडल आणि चक्क मास्कमधून मोबाईल सारख डिव्हाईस पोलिसांनी जप्त केले आहे.

मास्कच्या आत बॅटरी, कॅमेरा आणि सिम कार्ड होत. तो पोलिसांना फसवून आत जाण्याच्या अगोदर त्याला पकडण्यात आले. ही घटना हिंजवडी येथील ब्लू रिच या सेंटरवर समोर आली.

याबाबत अधिक माहिती अशी कि, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपायाच्या ७२० जागांच्या भरतीसाठी ८० सेंटरवर लेखी परीक्षा परीक्षा झाली.

एकूण १ लाख ८९ हजार ७३२ उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. कॉपी सारखे गैरप्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी भरारी पथक नेमण्यात आले होते.

लेखी परीक्षेच्या पूर्वी परीक्षार्थींना आतमध्ये सोडत असताना एकाने चक्क मास्कमध्ये मोबाईल डिव्हाईस बनवून आणले होते. मास्कमध्ये सिमकार्ड, बॅटरी, कॅमेरा हे सापडलं असून त्यात वायरिंग करण्यात आली आहे.

त्यामधून इतर दुसऱ्या व्यक्तीला संवाद साधता येतो की नाही हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्याचे इतर साथीदार देखील असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. तो परीक्षार्थी पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाला असून तो पळून गेला आहे, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe