Godrej AC : लवकरच हिवाळ्याचे दिवस संपून उन्हाळ्याचे दिवस सुरु होतील. अनेकजण उकाड्यापासून वाचण्यासाठी घरात कुलर, एअर कंडिशनर बसवत आहेत. जर तुम्हालाही एअर कंडिशनर विकत घ्यायचा असेल तर तुमच्याकडे अनेक कंपन्यांचे पर्याय आहेत.
परंतु, हेच एअर कंडिशनर काही दिवसांनंतर खराब होऊ लागतात. त्यातून पाण्याची गळती सुरु होते. या समस्येपासून सध्या अनेकजण त्रस्त आहेत, जर तुम्हाला या समस्येपासून वाचायचे असेल तर तुम्ही आता गोदरेज या कंपनीचा 10 वर्षांची वॉरंटी असणारा लीकप्रूफ एसी विकत घेऊ शकता.

फक्त सौंदर्य आणि घाणीबद्दल काळजी करावी असे नाही, तर त्याच्याशी संबंधित इतरही अशा अनेक समस्या आहेत, जसे की वॉल पेंट किंवा वॉलपेपर खराब होणे, प्लग पॉइंट खाली असताना इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट होणे. जर तुम्हालाही अशी समस्या येत असेल तर,आता गोदरेज लिकेज प्रूफ एसी सुरू मार्केटमध्ये आल्याने ही समस्या दूर होणार आहे.
किती आहे गोदरेज एसीची किंमत?
गोदरेज लीक प्रूफ स्प्लिट एसी 10 वर्षांच्या इन्व्हर्टर कंप्रेसर वॉरंटीसह येत असून जर तुम्हाला तो खरेदी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला 48,900 रुपये मोजावे लागणार आहे. यात 100% कॉपर कॉइल्स असून त्यात गंजरोधक कनेक्टिंग पाईप्स आणि अँटी-कोरोसिव्ह ब्लू फिन्स कंपनीने दिल्या आहेत.
इतकेच नाही तर यात इन्व्हर्टर तंत्रज्ञान आहे. हे खोलीतील लोकांच्या संख्येवर आधारित सेट करता येणार आहे. जे ऊर्जा वाचविण्यात मदत करते. सेट तापमान व्यवस्थापित करण्यासाठी, आय-सेन्स तंत्रज्ञान असून जे 52 अंश सेल्सिअस तापमानातही कूलिंग प्रदान करते.
हा एसी 5-इन-1 परिवर्तनीय कूलिंग तंत्रज्ञानासारख्या तंत्रज्ञान आणि फीचर्सनी सुसज्ज असणार आहे. इतकेच नाही तर आता एसीमधून गळणाऱ्या पाण्याचा त्रास तुम्हाला सहन करावा लागणार नाही. भिंतींवर टपकणारे पाणीही रंग खराब करते. त्यामुळे हा एसी आजच आपल्या घरी स्थापित करून तणावमुक्त व्हा.