Farmer succes story : देशातील शेतकरी (Farmers) पुत्र सातत्याने शेती व्यवसायात तोटा सहन करावा लागत असल्याने शेतीपासून (Farming) दुरावत चालले आहेत.
शेतकरी बांधवांना देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घेऊन नोकरी करावी असेच वाटू लागले आहे. मात्र असे असले तरी देशात असेही अनेक शेतकरी पुत्र आहेत जे शेती व्यवसायात वेगळा मार्ग चोखंदळत चांगले यश संपादित करत असून लाखों रुपयांची कमाई करत आहेत.
उत्तर प्रदेश मधील कोशांबी जिल्ह्यातील एका नवयुवक शेतकरी पुत्राने देखील शेती व्यवसायात मोठा बदल करून स्ट्रॉबेरी शेतीच्या माध्यमातून (Strawberry Farming) लाखों रुपये कमावण्याची किमया साधली आहे.
मित्रांनो कोशांबी जिल्ह्याच्या मौजे टेंगई येथील रवींद्रकुमार पांडे हे उच्चशिक्षित शेतकरी पुत्र आहेत. उच्चशिक्षित असून देखील पांडे यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला अन अवघ्या सव्वा एकर जमिनीवर ड्रॅगन फळाची लागवड सुरु केली.
यातून त्यांना आता दरवर्षी 4 लाख रुपये कमाई होतं आहे. ड्रॅगन फ्रूटच्या शेतीत ते वर्षाला दोन लाख रुपये कमावतात, तर ड्रॅगन फ्रूट रोपांची रोपवाटिका उभारून शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूटची रोपे विकूनही ते 2 लाख रुपये कमवत आहेत.
ड्रॅगन फ्रुटची फळे आणि रोपे विकण्याबरोबरच ते ड्रॅगन फ्रुटच्या शेतीत आंतरपीक देखील घेत आहेत. यातून त्यांचा ड्रॅगन फ्रूट लागवडीचा खर्च भागत असल्याचे ते नमूद करतात.
एलएलबी झाला मात्र शेतीला दिले प्राधान्य
खरं पाहता रवींद्र कुमार पांडे एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. उच्चशिक्षित असून देखील रवींद्र यांनी 2016 मध्ये पूर्णपणे शेती करण्यास सुरवात केली.
शेती करण्याचा निर्णय घेतल्यानंतर रवींद्र यांना एका सरकारी अधिकाऱ्याने ड्रॅगन फ्रूटची लागवड करण्याचा सल्ला दिला. अन मग काय उच्चशिक्षित रवींद्र यांनी ड्रॅगन फ्रुट शेती सुरु केली.
रवींद्रकुमार पांडे यांनी इंटरनेटवरून जमा केली माहिती
रवींद्र कुमार यांनी एका प्रशिक्षणादरम्यान ड्रॅगन फ्रूटची माहिती जाणुन घेतली. यानंतर त्यांनी इंटरनेटवर ड्रॅगन फ्रूटबद्दल माहिती गोळा केली तेव्हा त्यांना कळले की त्याचे पौष्टिक मूल्य खूप जास्त आहे.
त्याचवेळी रवींद्र पांडे यांच्या लक्षात आले की त्याचे मार्केटिंग केले तर निश्चितचं ड्रॅगन फ्रुटच्या शेतीतुन लाखों रुपयांची कमाई सहज शक्य आहे.
थायलंडमधून मागवली 400 रोपे
सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांना आणि इतर काही शेतकऱ्यांना थायलंडमधून उत्तम दर्जाची ड्रॅगन फळांची रोपे आणून दिली. या झाडांना दीड वर्षात फळे येतात. सव्वा एकरात ड्रॅगन फळाची लागवड करण्यासाठी त्यांना 60 हजार रुपये खर्च आला.
त्यात 20 हजार रुपये मात्र रोपांचे होते. म्हणजेच 20 हजारात त्यांना 400 रोपे मिळाली. रवींद्र पांडे यापूर्वी ड्रॅगन फ्रूटमध्ये जास्त प्रमाणात रासायनिक खत वापरत होते. हे ड्रॅगन फ्रूटच्या आरोग्यासाठी चांगले नव्हते आणि त्यांची फळेही चांगली येत नव्हती.
नंतर त्यांनी इंटरनेटवर परदेशातील काही लोकांशी संपर्क साधला आणि त्यासाठी सेंद्रिय खत सर्वोत्तम असल्याचे आढळले. यानंतर त्यांनी सेंद्रिय खताचा वापर सुरू केला आणि मग त्यांनी ड्रॅगन फ्रूटची सेंद्रिय पद्धतीने शेती सुरू केली यामुळे गुणवत्तादेखील सुधारली.
विक्रीसाठी वापरली ही अनोखी पद्धत
रवींद्र कुमार पांडे यांनी आपल्या जवळील सरकारी दवाखान्यात जाऊन ड्रॅगन फ्रुट च्या आरोग्यदायी फायद्याविषयी पेशंटला सांगितले. ड्रॅगन फ्रुट डेंगु मध्ये गुणकारी असल्याचे त्यांनी सांगितले आणि पेशन्टला देखील याचा फायदा झाला.
डॉक्टरांनी देखील रुग्णांना याच्या सेवणाचा सल्ला दिला. मग काय आता रवींद्र कुमार पांडे यांचे सर्व ड्रॅगन फ्रुट त्यांच्या जिल्ह्यातचं विकले जातं आहे. निश्चितचं रवींद्र यांचे हे यश इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आहे.