अहमदनगर Live24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी गावाजवळ गोदावरी उजव्या कॅनॉललगत असलेल्या गुडघे वस्तीवर बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्या फस्त केल्या. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे हल्ले वाढतच आहेत.
त्यामुळे येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली आहेत. सोनेवाडी येथील विठ्ठल दशरथ गुडघे यांच्या वस्तीवर शेडमध्ये बांधलेल्या होत्या. शेतीचे व इतर काम असल्याने रात्री कुटुंब झोपेत असताना बिबट्याने डाव साधला.

सकाळी विठ्ठल गुडघे त्यांना सकाळी हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ उपसरपंच जावळे त्यांना माहिती दिली. नंतर परिसरात बिबट्या असल्याचे माग शोधले. गेल्या महिन्यातही या बिबट्याने शिकार केल्याच्या घटना घडल्या होत्या.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत उपसरपंच जावळे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. घडलेल्या प्रकाराची माहिती त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













