LG Inverter AC : उन्हाळ्याचे दिवस सुरु आहे. त्यामुळे एसी, कुलर, फ्रिज तसेच फॅन सारख्या इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर वाढत चालला आहे. इलेक्ट्रिक वस्तूंचा वापर वाढल्यामुळे नागरिकांना वीजबिल जास्त येत आहे. वाढत्या वीजबिलामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
परंतु, आता सर्वसामान्य जनतेला वाढत्या महागाईत दिलासा मिळू शकतो. कारण बाजारात आता वीज बिल वाचवणारा इन्व्हर्टर एसी उपलब्ध आहे. खूप कमी पैशात तुम्ही इन्व्हर्टर एसी खरेदी करू शकता. अशी भन्नाट संधी सध्या फ्लिपकार्टवर मिळत आहे.
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या झपाट्याने वाढणाऱ्या महागाईचा सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा आर्थिक भार पडत आहे. अशातच आता हे ओझे कमी करण्यासाठी फ्लिपकार्टने एक शानदार ऑफर आणली आहे.
किती आहे LG Inverter AC ची किंमत ?
या AC वर कंपनीकडून 10 वर्षांची वॉरंटी देण्यात येत आहे. 1.5 टन AC ची किंमत 68,990 रुपये इतकी आहे मात्र तुम्ही तो 44% डिस्काउंटनंतर फक्त 37,990 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. इतकेच नाही तर यासोबतच तुम्हाला यावर अनेक बँक ऑफर्सही दिल्या जात आहेत.
Axis Bank क्रेडिट कार्डसह EMI व्यवहारांवर अतिरिक्त 10% सवलत मिळू शकते. तसेच तुम्हाला IDBI बँक क्रेडिट कार्डवरही अशीच सवलत दिली जात आहे. जर तुम्ही या कार्डद्वारे पैसे भरले तर तुम्हाला 10% पर्यंत सवलत देखील मिळू शकते.
जर तुम्ही CITI क्रेडिट कार्डवरून पैसे भरले तर यावर 10% सूट उपलब्ध आहे आणि ही सवलत EMI व्यवहारांवर उपलब्ध असून तुम्ही जुना एसी फ्लिपकार्टला परत करू शकता. त्याऐवजी तुम्हाला 4 हजार रुपयांची सूट मिळू शकते. याला कंपनीकडून 1 वर्षाची वॉरंटी दिली जात आहे तर PCB साठी 5 वर्षांची वॉरंटी उपलब्ध करून देण्यात आली आहे.