LIC Policy : ‘या’ योजनेत गुंतवणूक करून करोडपती होण्याची संधी गमावू नका , जाणून घ्या

LIC Policy : जर अचानक पैशांची कमतरता भासल्यास कर्जांशिवाय (Loan) पर्याय उपलब्ध नसतो. परंतु आज अशी बरीच साधने आहेत ज्यामुळे पैशांची कमतरता तर दूर होईलच त्याचबरोबर अल्पावधीतच करोडपती (millionaire) होऊ शकतो.

LIC च्या जीवन शिरोमणी पॉलिसी (LIC Life Shiromani Policy) योजनेद्वारे अवघ्या चार वर्षात करोडपती बनू शकतो. परंतु या योजनेसाठी काही नियम आणि अटी लागू केल्या आहेत.

LIC जीवन शिरोमणी पॉलिसी काय आहे?

LIC जीवन शिरोमणी पॉलिसी ही एक सहभागी, नॉन-लिंक्ड (Non-linked) वैयक्तिक जीवन विमा बचत योजना आहे. या योजनेत 1 कोटी रुपयांच्या विमा (Insurance) रकमेची हमी आहे. जीवन शिरोमणी पॉलिसी 1 कोटी रुपयांची मूळ विमा रक्कम ऑफर करते.

पॉलिसी धारकाला लाभ घेण्यापूर्वी केवळ चार वर्षांसाठी या पॉलिसीमध्ये गुंतवणूक (Investment) करावी लागेल. LIC जीवन शिरोमणी पॉलिसीमध्ये 14, 16, 18 आणि 20 वर्षे अशा चार परिपक्वता आहेत.

कव्हरेजचा लाभ मिळवण्यासाठी, पॉलिसी धारकाला सुमारे 94,000 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागेल. ही योजना विशेषतः उच्च निव्वळ संपत्ती असलेल्या व्यक्तींसाठी डिझाइन केलेली आहे. 

जाणून घ्या योजनेच्या अटी आणि नियम काय आहेत? 

एलआयसी जीवन शिरोमणी योजनेसाठी पात्र होण्यासाठी, पॉलिसीधारकाचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे. 14 वर्षांच्या पॉलिसी अटींसाठी कमाल वय 55 वर्षे असावे. 16 वर्षांच्या पॉलिसीसाठी 51 वर्षे, 18 वर्षांच्या पॉलिसीसाठी 48 वर्षे आणि 20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 45 वर्षे गरजेचे आहे.

योजनेचे फायदे एलआयसी जीवन शिरोमणी योजनेंतर्गत, काही नियमांच्या अधीन राहून, किमान एक वर्षाचा प्रीमियम भरल्यानंतर आणि एक पॉलिसी वर्ष पूर्ण केल्यानंतर, कर्जाची सुविधा देखील उपलब्ध आहे आणि मृत्यूचा लाभ देखील उपलब्ध आहे.”

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe