LIC Policy : शानदार स्कीम! कमी गुंतवणुकीत मिळवा लाखोंचा परतावा, कसे ते पहा

Pragati
Published:
LIC Policy

LIC Policy : एलआयसीच्या प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळ्या योजना उपलब्ध आहेत. तुम्ही कोणत्याही योजनेत गुंतवणूक चांगला परतावा मिळवू शकता. अशीच एलआयसीची एक योजना आहे ज्यात तुम्ही गुंतवणूक केल्यास 1 लाख रुपये पेन्शन मिळेल.

प्रत्येक जणाला आपल्या कमाईचा काही भाग अशा ठिकाणी गुंतवायचा असतो, ज्याठिकाणी निवृत्तीनंतरची आर्थिक संकटे सहज टाळता येऊ शकतात. मग तुमच्यासाठी एलआयसीची नवीन जीवन शांती योजना खूप फायदेशीर आहे. कारण ही पॉलिसी तुम्हाला निवृत्तीनंतर गुंतवणूक केल्यास नियमित पेन्शनची हमी देते. याचा अर्थ असा आहे की, गुंतवणुकीनंतर, निवृत्तीनंतर तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी पेन्शन मिळेल.

वय

जर तुम्हाला या पॉलिसीचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी तुमचे वय ३० ते ७९ वर्षांच्या दरम्यान असावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या योजनेत कोणताही धोका नसून ही योजना फायद्यांबद्दल खूप लोकप्रिय आहे. एलआयसी प्लॅन खरेदी करण्यासाठी कंपनीकडून दोन प्रकारचे पर्याय देण्यात येतात. यातील पहिली एकल जीवनासाठी स्थगित वार्षिकी असून दुसरी संयुक्त जीवनासाठी स्थगित वार्षिकी अशी आहे. त्यापैकी तुम्ही एकल आणि एकत्रित पर्याय निवडू शकता.

असे मिळवा 1 लाख रुपये

जीवन शांती योजनेच्या खरेदीसह, तुमची पेन्शन मर्यादा निश्चित करता येईल. तुम्हाला निवृत्तीनंतर तुमच्या संपूर्ण आयुष्यासाठी ही निश्चित पेन्शन मिळेल. या योजनेत उत्कृष्ट व्याज उपलब्ध असून या योजनेवर नजर टाकायची झाली तर, जर 55 वर्षांच्या व्यक्तीने हा प्लॅन खरेदी करत असताना योजनेत 11 लाख रुपये जमा करून ते 5 वर्षांसाठी ठेवले तर, या एकरकमी गुंतवणुकीवर वार्षिक परतावा 1,01,880 रुपये असेल, तसेच 6 महिन्यांच्या आधारे मिळणारी पेन्शनची रक्कम 49 हजार 911 रुपये आणि दरमहा पेन्शन 8,149 रुपये मिळेल.

पॉलिसी करता येते सरेंडर

नवीन जीवन शांती पॉलिसीसाठी एलआयसीने या जानेवारीत वार्षिकी दर वाढवले ​​आहेत.तुम्हाला ही योजना कधीही सरेंडर करता येते. त्यात कमीत कमी 1.5 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. यात गुंतवणुकीची कमाल मर्यादा नसते. ही योजना घेतल्यानंतर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर संपूर्ण रक्कम नॉमिनीला जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe