LIC Policy : LIC मार्फत देशातील प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी अनेक बचत योजना राबवल्या जातात. यात अनेक योजनांचा समावेश आहे. खरंतर LIC च्या योजना या एक उत्तम बचत आणि सुरक्षित योजना आहे. त्यामुळे अनेकजण यात गुंतवणूक करतात.
अशीच LIC ची एक पॉलिसी आहे जिचे नाव उमंग पॉलिसी असे आहे. जर तुम्ही यात दररोज 45 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 36 हजार रुपयांचा फायदा होईल. काय आहे LIC ची ही भन्नाट योजना? जाणून घ्या.

कोणाला विकत घेता येईल पॉलिसी?
एलआयसीच्या या शानदार पॉलिसीमध्ये एक दोन नाही तर तब्बल 100 वर्षांसाठी गुंतवणूक करता येईल. एलआयसीचा हा शानदार प्लॅन एकूण 90 दिवसांपासून ते 55 वर्षे वयापर्यंत खरेदी करता येतो. या पॉलिसीच्या मुदतपूर्तीनंतर, पॉलिसीधारकाच्या खात्यात प्रत्येक वर्षी एक निश्चित रक्कम येते. समजा पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला संपूर्ण रक्कम एकत्रितपणे मिळते.
मिळतात कर सवलती
आता तुम्हाला जीवन उमंग पॉलिसीत 15 वर्षे, 20 वर्षे, 25 वर्षे, 30 वर्षे अशी गुंतवणूक करता येते. समजा एखाद्या पॉलिसीधारकाचा अपघाती मृत्यू झाला किंवा तो अपंग झाला तर त्याला उमंग पॉलिसी अंतर्गत मुदत देखील देण्यात येते. तसेच या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनाही करामध्ये विशेष सवलत मिळते. आयकराच्या कलम 80C अंतर्गत, जीवन उमंग पॉलिसीमध्ये गुंतवणूक करत असणाऱ्यांना कर लाभ मिळतात. समजा तुम्हाला जीवन उमंग पॉलिसी घ्यायची असल्यास तुम्हाला कमीत कमी 2 लाख रुपयांचा विमा घ्यावा लागतो.
मिळेल शानदार परतावा
समजा एखादी व्यक्ती 26 वर्षांची असल्यास त्याने जीवन उमंग पॉलिसी खरेदी केली तर त्या व्यक्तीला 4.5 लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. समजा तुम्ही 30 वर्षांसाठी प्रीमियम भरल्यास तुम्हाला मासिक 1350 रुपये भरावे लागतात. अशा प्रकारे, तुम्हाला या योजनेच्या गुंतवणुकीसाठी दररोज 45 रुपये वाचवावे लागणार आहेत.
हे लक्षात घ्या की यात तुमचा वार्षिक प्रीमियम 15882 रुपये आणि 30 वर्षांमध्ये तुमचा प्रीमियम 47,6460 रुपये इतका असेल. अशा प्रकारे, LIC मध्ये तुमच्या गुंतवणुकीच्या वयाच्या 31 व्या वर्षी तुम्हाला वार्षिक 36 हजार रुपयांचा परतावा मिळू शकतो. यानंतर तुम्हाला 100 वर्षांपर्यंत 36 हजार रुपये मिळतील.