LIC Policy : फक्त एकदा गुंतवा ‘या’ योजनेत पैसे आणि आयुष्यभर मिळवा दरमहा 7 हजारांपर्यंत पेन्शन

Published on -

LIC Policy : भारतीय जीवन विमा कंपनी आपल्या ग्राहकांसाठी सतत विविध प्लॅन घेऊन येत असते. कंपनीची ही अशीच एक योजना आहे ती म्हणजे जीवन अक्षय योजना होय. या योजनेमध्ये ग्राहकांना केवळ एकदाच एक विशिष्ट रक्कम भरावी लागते.

त्यानंतर त्याला आयुष्यभरासाठी प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम पेन्शनच्या स्वरूपात देण्यात येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही रक्कम आपण या योजनेमध्ये किती रुपयांची गुंतवणूक करणार यावर अवलंबून असते. दरम्यान काय आहे ही योजना जाणून घ्या.

काय आहे पॉलिसी?

कंपनीकडून या योजनेला जीवन अक्षय पॉलिसी असे नाव देण्यात आले असून जी तुम्हाला केवळ एकदाच गुंतवणूक करून चांगला परतावा देईल. या योजनेत लाभार्थीचा मृत्यू होईपर्यंत परतावा मिळत राहील. तर प्रत्येक महिन्याला पेन्शन म्हणून ठराविक रक्कम मिळेल. तुम्ही या योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला ठराविक कालावधीनंतर मासिक किंवा त्रैमासिक किंवा वार्षिक पेन्शन मिळेल. खरं तर LIC ला तुमच्या पैशातून व्याज मिळेल ज्यात तुम्हाला पेन्शन देण्यात येईल.

कोणाला करता येईल अर्ज?

जर तुम्हाला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुमचे वय 30 ते 85 वयोगटातील असावे. या योजनेत तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल.

या योजनेतील एकल प्रीमियम म्हणून कमीत कमी गुंतवणूक रक्कम रु 1 लाख इतकी आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे संयुक्त गुंतवणूकदारांना या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करता येईल.

प्रत्येक गुंतवणूकदारांना वैयक्तिकरित्या कमीत कमी 1 लाख रुपये गुंतवावे लागणार आहे. त्यामुळे तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितकी जास्त पेन्शन तुम्हाला मिळणार आहे.

अॅन्युइटी पर्याय

या पॉलिसीमध्ये 10 पेक्षा जास्त उपलब्ध वार्षिकी पर्याय प्रदान करण्यात येत आहेत. या पॉलिसी धारकाला पॉलिसीच्या सुरूवातीस गॅरंटीड अॅन्युइटी दर दिला जातो. तुम्ही निवडलेल्या पर्यायावर अवलंबून गुंतवणुकीवरील परतावा थोडा बदलला जातो.

किती मिळते पेन्शन

एका गुंतवणूकदाराने या पॉलिसीमध्ये एकाच वेळी 9,16,200 रुपये जमा केले. तर साधारणपणे, गुंतवणूक सुमारे 9 लाख रुपये इतकी असून गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीतून परतावा किंवा पेन्शन म्हणून प्रत्येक महिन्याला 6,859 रुपये मिळतात. त्याला वार्षिक 86,265 रुपये किंवा सहामाही आधारावर 42,008 रुपये किंवा तिमाही आधारावर 20,745 रुपये मिळतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe