LIC Policy : तुम्ही आता कोणत्याही जास्त परतावा देणाऱ्या बचत योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. काही योजनांमध्ये सर्वात जास्त परतावा मिळतो. LIC ची अशीच एक योजना आहे ज्यात तुम्हाला 194 रुपयांची बचत 40 लाख रुपयांचा निधी मिळेल.
LIC ची ही जीवन लाभ पॉलिसी आहे. ज्यात तुम्हाला उत्तम परतावा मिळत आहे. अनेकजण या योजनेमध्ये गुंतवणूक करत आहेत. 25 वर्षांनी तुम्हाला 40,50,000 रुपयांचा परतावा मिळेल. कसे ते जाणून घ्या सविस्तर माहिती.
किती मिळेल विम्याची रक्कम?
8 वर्षे ते 59 वर्षे वयोगटातील लोकांना जीवन लाभ पॉलिसी खरेदी करता येते. या योजनेची कमीत कमी हमी 2 लाख रुपये इतकी आहे. परंतु याच्या जास्तीत जास्त गुंतवणुकीवर मर्यादा नाही. समजा गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला तर त्यासाठी विमा संरक्षण देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासोबतच गरज पडली तर पॉलिसीच्या आधारावर तुम्हाला सहज कर्ज घेता येते. LIC च्या जीवन लाभ योजनेमध्ये तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करून, तुम्ही तुमच्या भविष्यासाठी चांगली बचत करू शकता.
करा इतकी बचत
समजा तुमचे वय 25 वर्षे असेल आणि तुम्ही ही LIC पॉलिसी 25 वर्षांसाठी खरेदी करणार असाल तर यासाठी तुम्ही 15 लाख रुपयांची विमा रक्कम घेऊ शकता. तसेच तुम्हाला पॉलिसीच्या पहिल्या वर्षामध्ये 70,188 रुपये प्रीमियम भरावा लागणार आहे. दुसऱ्या वर्षी प्रीमियम 68,677 रुपये असणार आहे. याचा असा अर्थ की तुम्हाला मासिक 5842 रुपये वाचवावे लागणार आहेत. म्हणजेच तुम्हाला दररोज 194 रुपये वाचवावे लागू शकतात.
मिळेल 40 लाखांचा परतावा
हे लक्षात घ्या की तुमची योजना 25 वर्षात पूर्ण झाली तर त्यावर तुम्हाला सुमारे 40 लाख रुपयांची मोठी रक्कम मिळेल. तुमची विमा रक्कम 15 लाख रुपये असणार आहे. यात तुम्हाला 11,00,347 रुपये जमा करावे लागणार आहेत. अंदाजे तुम्हाला 18,75,000 रुपये बोनस म्हणून मिळतील. तसेच तुम्हाला अंतिम आवृत्ती बोनस म्हणून 6,75,000 रुपये मिळतील. अशा प्रकारे 25 वर्षांनी तुम्हाला 40,50,000 रुपयांचा परतावा मिळेल.