LIC Policy Update : एलआयसीकडून आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या योजना पुरवण्यात येतात. या योजना ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार निवडता येतात. एलआयसीमध्ये अशा अनेक योजना आहेत, ज्याद्वारे तुम्ही मोठ्या प्रमाणात निधी जमा करू शकता.
LIC ची अशीच एक योजना आहे जिचे नाव एंडोमेंट प्लॅन योजना. या योजनेत तुम्हाला शानदार परतावा तर मिळेलच शिवाय तुम्हाला या योजनेत कर्जही मिळू शकते. तुम्हाला यात अवघ्या 253 रुपयांच्या गुंतवणुकीवर 54.50 लाखांचा परतावा मिळेल. कसे ते पहा.
काय आहे पॉलिसी ? जाणून घ्या
ही एक मूलभूत एंडोमेंट पॉलिसी असून ज्यात तुम्हाला मर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरावा लागणार आहे. या पॉलिसी अंतर्गत गुंतवणुकीची किमान रक्कम दोन लाख निश्चित केली आहे, तर कमाल गुंतवणुकीची रक्कम अजूनही निश्चित केली नाही. तसेच जर तुम्ही 3 वर्षांसाठी प्रीमियम भरला तर तुम्हाला कर्जाची सुविधा उपलब्ध होते. इतकेच नाही तर प्रीमियमवर आणि पॉलिसी धारकाच्या मृत्यूवर कर सूट, नॉमिनीला विमा रक्कम तसेच बोनसचा लाभ देण्यात येतो.
कोणते मिळतात फायदे?
पॉलिसीधारक हा अनेक कालावधीत गुंतवलेले पैसे परिपक्व करणे निवडू शकतो. तुमच्या मतानुसार, तुम्ही 16 वर्षे, 21 आणि 25 वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी निवडू शकता. तसेच तुम्ही हप्त्यांमध्ये प्रीमियमची रक्कम भरू शकता. मुदतपूर्तीपूर्वी पॉलिसीधारकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर, पॉलिसीधारकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येते. तसेच खातेदारांना कर्जाची सुविधा देण्यात येते.
मिळणार 54.50 लाख रुपये
समजा तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी 25 वर्षांच्या मुदतीची जीवन लाभ पॉलिसी खरेदी केली तर, तुम्हाला मॅच्युरिटीवर 54 लाख रुपये दिले जातील. या पॉलिसी अंतर्गत, तुम्हाला प्रति महिना 7700 रुपये प्रीमियम मिळू शकतो, तर त्याची किंमत प्रतिदिन 253 रुपये इतकी असणार आहे. अवघ्या 253 रुपयांच्या रोजच्या गुंतवणुकीसह, तुम्हाला मॅच्युरिटीच्या वेळी एकूण 54.50 लाख रुपये मिळू शकतात.