LIC Policy : देशातील महिला सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक योजना आणत आहे. त्यामधून लाखो महिलांना रोजगार देखील उपलब्ध होत आहे. महिलांना एलआयसीकडून एक मस्त योजना सादर करण्यात आली आहे.
या योजनेमध्ये फक्त काही रुपये गुंतवून महिला लाखो रुपये कमवू शकतात. आधार शिला योजना असे एलआयसीच्या योजनेचे नाव आहे. या योजनेत महिलांना अधिक फायदा मिळत आहे.
LIC च्या या योजनेत महिला ८ वर्षांपासून ते ५५ वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकतात. फक्त दररोज ५८ रुपये गुंतवायचे आहेत. या ५८ रुपयांच्या योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर ८ लाख रुपये मिळणार आहेत.
देशातील करोडो नागरिक एलआयसीच्या योजनांमध्ये गुंतवणूक करत आहेत. एलआयसीकडून नेहमी ग्राहकांसाठी नवनवीन योजना सादर केल्या जात आहेत. ज्यामधून ग्राहकांना अधिक मोबदला मिळतो.
LIC च्या योजनांमध्ये पैसे गुंतवून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीने ज्या व्यक्तीला नॉमिनी केले आहे त्या व्यक्तीला ते पैसे मिळतात. मृत्यूनंतरही पूर्ण रक्कम नॉमिनीला दिली जाते.
आधार पॉलिसीची खासियत
एलआयसी आधार शिला योजना खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे.
पॉलिसीची किमान मुदत 10 वर्षे आणि कमाल 20 वर्षे आहे.
या योजनेच्या मॅच्युरिटीचे कमाल वय ७० वर्षे आहे.
पॉलिसी धारकाचा (एलआयसी इंडिया) पॉलिसी घेतल्याच्या 5 वर्षानंतर मृत्यू झाल्यास, अशा परिस्थितीत कुटुंबाला मॅच्युरिटीवर लॉयल्टी अॅडिशनची सुविधा मिळेल.
पॉलिसी मुदत संपल्यावर एकरकमी रक्कम देखील प्राप्त होईल.
योजनेअंतर्गत, तुम्ही किमान 75000 रुपये आणि जास्तीत जास्त 3 लाख रुपये गुंतवू शकता.
मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर या योजनेचा प्रीमियम भरण्याचा पर्याय आहे.