lifestyle tips for healthy skin ; सूर्याच्या किरणांपासून त्वचा कशी वाचवावी ?

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- सुर्याच्या अतिनील किरणांचा त्वचेशी थेट संपर्क आल्यास त्वचा रापणे, काळवंडणे, शुष्क होणे, लवकर सुरकुत्या पडणे असे दुष्परिणाम दूरगामी होतात.

विशेषतः सनस्क्रीन लोशन रासायनिक द्रव्यांचा वापर असलेली आणि नैसर्गिक वस्तूंचा वापर करून तयार केली जातात. प्रत्येकाने आपल्या त्वचेकरिता कोणते सनस्क्रीन क्रीम योग्य आहे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवावे.

» कॉर्नफ्लॉवर हे त्वचेवर एक्सफोलिएट म्हणून काम करतं. आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर आणि मानेवर कॉर्नफ्लोअर लावून चेहरा व्यवस्थित धुतल्याने त्वचा स्वच्छ होण्यास मदत होते.

» साबणाने चेहरा धुतल्यावर व्हिनेगरचे काही थेंब पाण्यात मिक्स करा. या पाण्याने चेहरा पुसून काढा. यामुळे साबणामधील केमिकल्सचा चेहऱ्यावर होणार्‍या दुष्परिणामांपासून बचाव होतो.

» चेहऱ्यावर खुपदा साबण चोळून त्याचा फेस काढणे टाळायला हवं. त्वचा सैल पडू नये, यासाठी अंड्याचा पांढरा बलक चेहऱ्याला चोळून लावा. चेहऱ्याला लावलेला हा बलक कोमट पाण्याने तोंड धुवा. यामुळे स्क्रिन टाइट होते.

» चेहऱ्यावर स्क्रवचा अती वापर करू नका. यामुळे त्वचेला नुकसान पोहोचू शकतो.

» ओठ फुटले असतील तर रोज रात्री झोपण्यापूर्वी ओठांना पेट्रोलिअम जेली, मिनरल ऑइल किंवा व्हेजिटेबल ऑइल लावा.

» दिवसभरात भरपूर पाणी पिणं, हे त्वचेसाठी खूपच फायद्याचं असतं.

» हातांची काळजी घेण्यासाठी रोज रात्री झोपण्यापूर्वी हात पाण्याने ओले करा. मग थोडं तेल किंवा क्रीम हातावर चोळा. हे क्रीम/तेल हातांनी शोषून घ्या. अतिरिक्त तेल पुसून टाका. यामुळे हाताची त्वचा मृदू होईल.

» उन्हाळ्यात शरीराचे तापमान योग्य राहील आणि उष्णतेपासून आराम मिळेल, अशा आहाराची निवड करावी. खरबूज, टरबूज, अननस, कलिंगड, संत्र, मोसंबी, आंबा अशी रसदार फळे खावीत. सनबर्न पासून रक्षण होण्यासाठी टोमॅटो खावेत. भरपूर पाणी प्यावे. आहारात पालेभाज्यांचा समावेश करावा. पालेभाज्यांमध्ये प्रोटीन, फायबर आणि जीवमनसत्त्चे असतात.

» जेल, प्रे, लोशन, क्रीम, वाइप्स अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सनस्क्रीन लोशन उपलब्ध आहे. त्वचेच्या प्रकारानुसार त्याचा वापर करावा. उदा. तेलकट त्वचेकरिता जेल वापरणे योग्य आहे. कारण ते तेलयुक्त आहे, तसेच सनस्क्रीन वाइपचा पर्याय लहान मुलांकरिता योग्य असून खेळाडूसाठी उपयुक्त आहे.

» दररोज अंघोळ केल्यानंतत आणि घराबाहेर जाताना त्वचेला सनस्क्रीन क्रीम लावा. शक्‍य झाल्यास दर तीन-चार तासांनी सनस्क्रीन क्रीम लावा. कमीत कमी एसपीएफ फॅक्टर ३0 असलेले क्रीम वापरावे.जे लोक पाण्यात काम करतात त्यांनी वॉटरप्रूफ क्रीम वापरावे.

» सनस्क्रीन क्रीम किंवा लोशनवर अवलंबून राहू नये. त्याबरोबरच नेहमी छत्री, स्कार्फ, गॉगल इत्यादी वस्तूंचा ही वापर करावा.

» ऑफण्टिऑक्सिडंटच्या स्वरूपात ओरल किंवा सिस्टीमिक सनस्क्रीन हे त्वचातज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार घेऊ शकता.

» सूर्यकिरणांच्या प्रभावाने त्वचा रूपाली (सनटॅन) असल्यास साबण किंवा फेसवॉश आणि भरपूर पाण्याने त्वचा धुवा. त्यावर लगेच माँशरायजर लावा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe