Maharashtra News:सर्वोच्च न्यायालयासंबंधी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येणारी मागणी आता पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासोमर चालणाऱ्या महत्वाच्या खटल्यांचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
येत्या २७ सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे. योगायोगाने याच दिवसापासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचीही सुनावणी घटनापीठासमोर सुरू होणार आहे.

Government Employee News
न्याय क्षेत्रातील पारदर्शकता म्हणून खटल्यांचे थेट प्रक्षेपण करण्याची मागणी नागरिक आणि कायदे तज्ज्ञांकडूनही होत होती. अखेर सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या कार्यकाळात ती पूर्ण होत आहे.
२७ सप्टेंबरपासून सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठासमोर चालणाऱ्या महत्वाच्या खटल्यांचे इंटरनेटद्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना या खटल्यांचे कामकाज ऑनलाइन ऐकता येणार आहे.