राज्यात लॉकडाऊन अटळ; पण किती दिवसांचे हे शुक्रवारी समजेल

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 28 एप्रिल 2021 :-लॉकडाऊनसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. लॉकडाऊन वाढवावाच लागणार असल्याची परिस्थिती सध्या राज्यात आहे.

लॉकडाऊन १५ दिवस वाढवायचे किंवा किती वाढवायचे यावर शुक्रवारी (३० एप्रिल) निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. असल्याचं राजेश टोपे म्हणाले आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी लॉकडाऊनच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, सध्या आपण ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केला आहे. त्यासंदर्भात देखील मंत्रिमंडळात चर्चा झाली.

आपल्याला कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन वाढवावाच लागेल, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. मंत्रमंडळाने त्यासंदर्भात देखील चर्चा केली आहे. शेवटच्या दिवशी नक्की १५ दिवस वाढवायचे किंवा किती वाढवायचे यावर निर्णय घेतला जाईल.

पण लॉकडाउनमध्ये नक्कीच वाढ होईल. ती किमान १५ दिवसांची होईल असा माझा अंदाज आहे”, असं राजेश टोपे म्हणाले आहेत. दरम्यान, यावेळी राजेश टोपे यांनी खासगी रुग्णालयांमध्ये लस विकतच घ्यावी लागणार असल्याचं स्पष्ट केलं.

“खासगी रुग्णालयांमध्ये इथून पुढे लस पैसे देऊनच घ्यावी लागणार आहे. राज्य सरकारच्या दवाखान्यांमध्येच फक्त लस मोफत मिळू शकणार आहे, असं ते म्हणाले. राज्यात करोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

सार्वजनिक वाहतूक तसेच जिल्ह्य़ाबाहेरील येणाऱ्या वाहनांना ई-पास बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय अत्यावश्यक सेवेतील (औषध वगळता) दुकानांना केवळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबईत लोकलच्या प्रवासावर निर्बंध आहेत. आता मुंबई आणि ठाण्यातील रुग्णांची टक्केवारी घटली आहे.

पण, विदर्भ आणि मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत घट दिसत नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाउन पुन्हा वाढणार असल्याचं बोललं जात होतं. अखेर त्यासंदर्भातली महत्त्वपूर्ण माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe