अहमदनगर Live24 टीम, , 04 फेब्रुवारी 2022 :- शेतात सुरू असलेले पॉलीहाऊसचे काम का करू देत नाही. अशी विचारणा केल्याचा राग येऊन दोघांनी संबंधित महिलेस शिविगाळ करत थेट जीवे मारण्याची धमकी दिली.
ही घटना नगर तालुक्यातील अकोळनेर येथे घडली आहे. याप्रकरणी येथील अश्विनी सचिन भोर या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी २ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत सविस्तर असे की , अकोळनेर येथील अश्विनी सचिन भोर यांच्या शेतात पॉलिहाऊसचे काम सुरू आहे. दरम्यान दि.१८ जानेवारी रोजी विकास रखमाजी भोर आणि राजेंद्र रखमाजी भोर यांनी येथील कामगारांना तुम्ही येथे काम करावयाचे नाही असे सांगितले.
त्यामुळे कामगारांनी काम थांबवले. त्यामुळे फिर्यादी महिलेने त्यांना पॉलीहाऊसचे काम का करू देत नाही असे विचारले त्याचा राग राग आल्याने वरील दोघांनी फिर्यादी महिलेस शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
या प्रकरणी अश्विनी सचिन भोर यांच्या फिर्यादीवरून विकास रखमाजी भोर आणि राजेंद्र रखमाजी भोर यांच्या विरोधात नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम