LPG Cylinder Price Hiked : होळीपूर्वी ग्राहकांना मोठा झटका ! LPG सिलिंडरच्या किमती वाढल्या, पहा नवीन दर

LPG Cylinder Price Hiked

LPG Cylinder Price Hiked : सरकारी तेल आणि वायू कंपन्यांकडून देशातील जनतेला होळीपूर्वी मोठा धक्का देण्यात आला आहे. कारण एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आता ग्राहकांना वाढीव दराने एलपीजी सिलिंडर खरेदी करावे लागणार आहेत.

मार्च महिना सुरु होताच देशातील अनेक नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. गॅसच्या किमतीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीमध्ये बदल करण्यात आला आहे. आजपासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.

व्यावसायिक सिलिंडरच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत

देशात व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (HPCL) या कंपन्यांकडून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे.

आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या नवीन किमती लागू करण्यात आल्या आहेत. 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 25.50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14 किलो घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.

या वर्षी दोनदा भाव वाढले

नवीन वर्ष चालू झाल्यापासून गॅसच्या कितमीमध्ये दोन वेळा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा आर्थिक ताण पडणार आहे. होळीपूर्वीच गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने ग्राहकांना आर्थिक झळ बसत आहे.

प्रमुख शहरांमध्ये नवीनतम किंमती

मुंबईत 19 व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत 1723.50 रुपयांवरून 1749 रुपयांवर गेली आहे. कोलकातामध्ये 1887 रुपयांवरून 1911 रुपयांवर गेली आहे. दिल्लीत 1,769.50 रुपयांवरून 1,795.00 रुपये झाली आहे.

देशांतर्गत घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर

सरकारी तेल आणि वायू कंपन्यांकडून 14 किलोच्या सिलेंडरच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा एक प्रकारचा ग्राहकांना मोठ्या प्रकारचा दिलासा आहे. 30 ऑगस्ट 2024 मध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात बदल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe