LPG cylinder : केंद्र सरकारने महागाईने होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. ज्याचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. परंतु त्यासाठी नियम आणि अटी आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत 1,650 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे.
सरकारकडून 33 कोटी ग्राहकांच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती एकूण 200 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. तर या उज्ज्वला योजनेंतर्गत ग्राहकांना 400 रुपये प्रति सिलिंडर कमी किमतीत मिळणार आहे. कसे ते जाणून घेऊयात सविस्तरपणे.
केंद्र सरकारकडून ही योजना 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती. देशातील गरीब महिलांना धुरापासून मुक्त करण्यासाठी सुरू केली आहे. सध्या या योजनेशी एकूण 10 कोटी कुटुंबे जोडण्यात आली आहेत. हे लक्षात घ्या की उज्ज्वलाच्या लाभार्थ्यांना सध्या 200 रुपये अनुदान देण्यात येत आहे. अशाप्रकारे, योजनेवर उपलब्ध असणारी एकूण सवलत प्रति सिलिंडर 400 रुपये इतकी झाली आहे.
कोणाला मिळते सवलत? जाणून घ्या
उज्ज्वला योजनेंतर्गत, स्वस्त सिलिंडरचा लाभ केवळ दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) लोकांनाच मिळत आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत नोंदणी करण्यासाठी, लाभार्थ्यांना त्यांचे रेशन कार्ड (बीपीएल कार्ड) अपलोड करावे लागणार आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांनाच बीपीएल कार्ड उपलब्ध असून भारतात, ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 27 हजार रुपयांपेक्षा कमी असणाऱ्यांना हे कार्ड जारी करण्यात येते.
जाणून घ्या पात्रता
या योजनेच्या पात्रतेबद्दल बोलायचे झाले तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलेचे वय १८ वर्षे असावे. योजनेचा लाभ घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या की लाभार्थी कुटुंबाकडे अगोदरपासून कोणत्याही गॅस एजन्सीकडून इतर कोणतेही एलपीजी कनेक्शन नसावे. या योजनेचा लाभ सर्वसामान्य गरीब, अनुसूचित जाती, जमाती आणि अत्यंत मागासवर्गीय कुटुंबांना दिला जात आहे.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे
- पत्त्याच्या पुराव्यासाठी पाणी बिल, वीज बिल, ड्रायव्हिंग लायसन्स आणि रहिवासी प्रमाणपत्र
- अर्जदाराचे जॉब कार्ड
- कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड
- BPL चा सर्व्हे नंबर आणि मोबाईल नंबर
- गावप्रमुखाकडून मान्यता
- बीपीएल कार्डची फोटो प्रत