LPG cylinder : वाढत्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांसाठी (common people) आणखी एक वाईट बातमी आहे. आता बाहेरचे खाणे तुम्हाला महाग होणार आहे. जर तुम्ही हॉटेल्स, रेस्टॉरंट किंवा ढाब्यांवर खाण्याचे शौकीन असेल, तर आता तुम्हाला बिल भरण्यासाठी आणखी खिसा सोडावा लागेल.
याचा कारण म्हणजे व्यावसायिक एलपीजी सिलिंडर कनेक्शन(LPG cylinder connection)महाग झाले आहे. प्रत्यक्षात आजपासून म्हणजेच 28 जूनपासून 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचे कनेक्शन घेणे महागणार आहे. आता व्यावसायिक सिलिंडरचे कनेक्शन घेण्यासाठी लोकांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे खर्च करावे लागणार आहेत.

तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडर घेण्यासाठी सुरक्षा ठेव शुल्कात वाढ केली आहे. नवीन दर देखील आजपासून म्हणजेच 28 जूनपासून लागू झाले आहेत.
एलपीजी सिलेंडर कनेक्शन किती महाग झाले?
एससी व्हॉल्व्हसह 19 किलो सिलेंडरसाठी सुरक्षा ठेव दर 1700 रुपयांवरून 2400 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्याच वेळी, पॅनेलचा दर 2550 रुपयांवरून 3600 रुपये करण्यात आला आहे.
तर एससी व्हॉल्व्हसह 47.5 किलो व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा सुरक्षा ठेव दर 4300 रुपयांवरून 4900 रुपये करण्यात आला आहे. त्याच वेळी, टॅरिफ दर 4300 रुपयांवरून 4900 रुपये आणि पॅनेलचा दर 6450 रुपयांवरून 7350 रुपये झाला आहे.
घरगुती गॅस कनेक्शनही महाग
व्यावसायिक गॅस सिलिंडर कनेक्शनपूर्वी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर कनेक्शनही महाग झाले आहे. 16 जून रोजी घरगुती एलपीजी गॅस कनेक्शनच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. एलपीजी कनेक्शनच्या किमती वाढल्यानंतर आता तुम्हाला 14.2 किलो वजनाच्या एलपीजी गॅस सिलेंडरसाठी 2200 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी तुम्हाला एलपीजी कनेक्शनसाठी 1450 रुपये द्यावे लागत होते.