LPG Subsidy Rule Change: महागाई (Inflation) ने होरपळलेल्या सर्वसामान्यांसाठी एक वाईट बातमी आहे. एलपीजी सिलेंडर (LPG CYLINDER) वर दिलासा मिळण्याची आशा असलेल्या लोकांची या बातमीने निराशा होणार आहे.
उज्ज्वला योजना (Ujjwala Yojana) वगळता एलपीजी सिलिंडरवर कोणतीही सबसिडी मिळणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. इतर सर्व श्रेणीतील ग्राहकांना केवळ विनाअनुदानित दराने एलपीजी सिलिंडर (LPG cylinders at unsubsidized rates) खरेदी करावे लागतील.
आता अनुदान नाही, असे सरकारने स्पष्ट केले –
या संदर्भात परिस्थिती स्पष्ट करताना, तेल सचिव पंकज जैन (Pankaj Jain) यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत सांगितले की, जून 2020 पासून एलपीजी सिलिंडरवर कोणतेही अनुदान दिलेले नाही. या प्रकरणात केवळ सबसिडी दिली जात आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केली. जैन म्हणाले, ‘कोविड महामारीच्या सुरुवातीच्या दिवसांपासून एलपीजी सिलिंडर खरेदी करणाऱ्यांना कोणतेही अनुदान दिले जात नाही. तेव्हापासून फक्त एकच सबसिडी आहे आणि ती पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे.
अर्थमंत्र्यांनी मे महिन्यात ही घोषणा केली होती –
सचिवांच्या या विधानावरून हे स्पष्ट झाले आहे की, आता LPG वर अनुदान फक्त उज्ज्वला योजनेंतर्गत 9 कोटी गरीब महिला आणि इतर लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. याशिवाय इतर सर्व कुटुंबांना बाजारभावानेच सिलिंडर खरेदी करावे लागणार आहेत. डिझेल आणि पेट्रोलवरील उत्पादन शुल्क (Excise duty on diesel and petrol) कमी करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी गेल्या महिन्यात केली होती. त्यानंतर पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 8 रुपयांनी तर डिझेलवर 6 रुपयांनी कपात करण्यात आली. यासोबतच त्यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना वर्षभरात 12 सिलिंडरवर 200-200 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती.
सबसिडी फक्त उज्ज्वला योजनेतच मिळेल –
सध्या दिल्लीत 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 1,003 रुपये आहे. जे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना LPG सिलेंडर सध्याच्या 803 रुपयांना मिळेल. या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात 200 रुपये अनुदान पाठवले जाईल. उज्ज्वला योजनेचे लाभार्थी वगळता सर्व श्रेणीतील लोकांसाठी सिलिंडरची किंमत 1,003 रुपये राहील. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना सबसिडी दिल्यास सरकारी तिजोरीचे 6,100 कोटी रुपयांचे नुकसान होईल, असे अर्थमंत्र्यांनी तेव्हा सांगितले होते.
अशी सबसिडी एक एक करून संपली –
सरकार हळूहळू सर्वच गोष्टींवरील अनुदाने बंद करत आहे. सर्वप्रथम मनमोहन सिंग सरकारने जून 2010 मध्ये पेट्रोलवरील सबसिडी रद्द केली. यानंतर नोव्हेंबर 2014 मध्ये मोदी सरकारने डिझेलवरील सबसिडी बंद केली. काही वर्षांनी रॉकेलवरील अनुदानही बंद झाले. आता एलपीजी सिलिंडरवरील सबसिडीही एक प्रकारे संपली आहे. मोदी सरकारने यापूर्वी अनुदान स्वेच्छेने सोडण्याचा पर्याय दिला होता. आता हे अनुदान कोणत्याही औपचारिक आदेशाशिवाय रद्द करण्यात आले आहे.