मुंबई : माधुरी दीक्षितने बॉलीवूडमधला एक काळ गाजवला. ही ‘धकधक गर्ल’ अनेकांच्या हृदय सिंहासनावर आरूढ झाली होती. लग्नानंतर माधुरीने थोडा ब्रेक घेतला. ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाद्वारे तिने मराठीत पदार्पण केले. माधुरीचे सौंदर्य अजूनही कमी झालेले नाही.
तिने स्वत:ला अगदी नीट जपले आहे. मध्यंतरी ती एका रिअॅलिटी शोच्या सेटवर दिसली. या वेळी माधुरीने मस्टर्ड येलो आणि पांढऱ्या रंगाचं कॉम्बिनेशन असणारा अॅप्लिक वर्कवाला लेहंगा घातला होता.

या लूकमध्ये ती खूपच छान दिसत होती. सेलिब्रिटी स्टायलिस्ट दिशा पंजाबीने तिचा हा लूक खुलवला होता. या लेहंग्यावर तिने खड्यांचा बेल्ट लावला होता. बोटांमधल्या अंगठ्याही शोभून दिसत होत्या. तिने मोती आणि खड्यांच्या बांगड्या घातल्या होत्या.
- अहिल्यानगर : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अडचणीत, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसात गुन्हा दाखल !
- रेल्वे प्रवाशांसाठी कामाची बातमी ! तिकीट हरवल्यास काय कराल ? वाचा डिटेल्स
- अब्जावधी रुपये खर्चुनही ग्रामीण भागात टँकरने पाणीपुरवठा
- Ahilyanagar News : सह्याद्रीच्या कुशीतल्या देवरायांना मिळणार संरक्षण, वन विभागाचा ऐतिहासिक निर्णय
- Ahilyanagar Politics : अखेर सभापती राम शिंदे यांनी बाजी मारली ! रोहित पवारांचे वाईट दिवस सुरु…