अहमदनगर Live24 टीम, 13 मे 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने कडक लाॅकडाउन घोषीत केले, त्याला नागरिकांनही उत्तम प्रतिसाद दिला.
त्यामुळे रुग्णसंख्येचा आलेख कमी झाला, अशी माहिती महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. कोरोना प्रादूर्भावाबाबत महापौर वाकळे यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी उपमहापौर मालन ढोणे, सभागृह नेता रविंद्र बारस्कर, नगरसेवक महेंद्र गंधे, मनोज दुलम, रामदास आंधळे, अजय चितळे, उदय कराळे, मनोज ताठे उपस्थित होते.
वाकळे म्हणाले, कोरोना विषाणूची साखळी थांबवण्यासाठी मनपाच्या माध्यमातून रॅपीड टेस्टला गती देण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या घटण्यासाठी लॉकडाऊन वाढवणे आवश्यक होते.
अत्यावश्यक सेवेसाठी हॉस्पिटल, मेडिकल दूधविक्री सुरू होती. त्याशिवाय सर्व आस्थापना बंद ठेवल्यामुळे मोठा दिलासा मिळाला.
त्यामुळे नागरिकांना बाहेर जाण्याची गरज पडली नाही. नागरिकांनी प्रशासनास करावे आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|