विनायक मेटे यांच्या रूपाने संघर्षशील नेतृत्व महाराष्ट्राने गमावले – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Published on -

Maharashtra Politics :शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या निधनाने एक संघर्षशील नेतृत्व महाराष्ट्राने गमावले असल्याची शोक संवेदना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाचे वृत अत्यंत धक्कादायक आहे. गेली अनेक वर्षे त्यांच्याशी मित्रत्वाचे एक नाते होते. विविध प्रश्नाच्या संदर्भात त्यांची सदैव आग्रही भूमिका असायची.

अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेले ते व्यक्तिमत्त्व होते. राज्यात मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी सातत्याने वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष केला.

सरकार कोणतेही असो ते आपल्या मागण्यांपासून थोडेही दूर गेले नाहीत. प्रश्नांचा पाठपुरावा करणारा नेता हीच त्यांची समाजाच्या सर्व घटकामध्ये ओळख होती.

भाजप सरकारने आरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे विनायक मेटे अध्यक्ष होते.

स्मारकाच्या कामाचा पाठपुरावा त्यांचा सुरूच होता. जनसामांन्याशी बांधिलकी मानणारे नेतृत्व या दुर्दैवी घटनेन आपल्यातून हिरावून घेतले आहे. आशा शब्दात मंत्री श्री विखे पाटील यांनी विनायक मेटे यांना श्रध्दांजली अर्पण केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News