ब्रेकिंग ! ‘या’ तारखेपासून सुरू होणार दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा, पहा संपूर्ण वेळापत्रक

Published on -

Maharashtra News : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे विद्यार्थ्यांच्या बोर्ड एक्झाम संदर्भात.

खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत विचारणा केली जात आहे. दरम्यान आता बोर्डाकडून दहावी आणि बारावीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून हे टाइम टेबल जाहीर करण्यात आले असून यामुळे आता विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासाला आणखी गती द्यावी लागणार आहे.

राज्य मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या बोर्ड एक्झाम चे टाईम टेबल एका प्रसिद्ध पत्रकार च्या माध्यमातून जाहीर करण्यात आले आहे. मंडळाचे सहसचिव प्रमोद गोफणे यांनी एक प्रसिद्ध पत्रक जाहीर करून बोर्डाच्या परीक्षांबाबत माहिती दिली आहे. 

दहावीच्या परीक्षा कधी ?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एसएससी बोर्डाच्या लेखी परीक्षा 20 फेब्रुवारी – 18 मार्च दरम्यान होतील अशी माहिती दिली.

तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापनाच्या परीक्षा 2 फेब्रुवारी – 18 फेब्रुवारी या कालावधीत घेतल्या जाणार आहेत. शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, गृहशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातील. 

बारावीच्या परीक्षा कधी

HSC लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या, दरम्यान होतील. तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 23 जानेवारी ते 8 फेब्रुवारी या कालावधीत घेतली जाणार आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान, सामान्य ज्ञान या विषयांच्या प्रॅक्टिकल परीक्षा द्याव्या लागणार आहेत. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना आपापल्या विषयानुसार प्रॅक्टिकल परीक्षा द्याव्या लागतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe