Maharashtra Politics : देशभरात लोकसभेची लढाई आता सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील ४८ जागेंवर महायुती विरोधात महाविकास आघाडी अशी लढत आहे. दरम्यान आता महाराष्ट्रातील काही लढती अगदी खास झाल्या आहेत. उदा. अहमदनगर, बीड,शिरूर, बारामती आदी. यातील बारामतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. याचे कारण म्हणजे येथे पवार विरुद्ध पवार अशी लढत होणार आहे.
सुप्रिया सुळे व सुमित्रा पवार अशी ही नणंद भावजयी अशी ही लढत आहे. यातील हार जीत ही शरद पवार किंवा अजित पवार यांची हारजीत असणार आहे. परंतु तुम्हाला माहित आहे का की या आधीही येथे पवार विरोधात पवार अशी लढत झालेली आहे. जाणून घेऊयात हा किस्सा..
याआधी म्हणजे साधारण सहा-साडे सहा दशकांआधी पवारांविरोधात पवार असा समाना झाला होता. शरद पवार यांच्या मातोश्री शारदाताई अर्थात सर्व पवार कुटुंबिय या शेतकरी कामगार पक्षात (शेकाप) काम करत होते. परंतु शरद पवार पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर ते काँग्रेसच्या संपर्कात आले आणि ते काम सुरु केले. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पवारांना काँग्रेस युवकचे सचिवपद दिले.
पवार विरोधात पवार
1957 साली बारामतीतून केशवराव जेधे हे विजयी झालेले होते. परंतु आगामी दोनच वर्षात जेधे यांचे निधन झाल्यानंतर 1959 मध्ये या जागेवर जी पोटनिवडणूक झाली त्या जागेवर केशवराव जेधे यांचे सुपुत्र गुलाब जेधे यांना काँग्रेसने तिकीट दिले. त्यांच्याविरोधात शेकापने शरद पवार यांचे सख्खे बंधू वसंतराव पवार यांना तिकीट दिले होते. एकीकडे आपला सख्खा बंधू तर दुसरीडे आपला पक्ष असे धर्मसंकट शरद पवार यांच्यापुढे राजकीय कारकिर्दीच्या सुरवातीलाच उभे ठाकले.
भावानेच दिला शरद पवारांना ‘हा’ सल्ला –
वसंतराव पवार यांनी शरद पवारांसमोर असणारे धर्मसंकट ओळखले व सल्ला दिला की आता तू वेगळा राजकीय विचार स्वीकारला आहेस तर तू जिथे कार्यरत आहेस त्या पक्षाचा प्रचार कर. या गोष्टीला आमची काहीही हरकत नसेल असे ते म्हणाले होते. पवार यांच्या मातोश्री शारदाताईंनी देखील याबाबत आक्षेप नोंदवला नव्हता. या निवडणुकीत काँग्रेसचे गुलाब जेधे विजयी झाले होते. अशा पद्धतीने आपल्या राजकीय कारकीर्दीच्या प्रारंभीच शरद पवारांना आपल्या सख्ख्या बंधूंविरोधात प्रचार करावा लागला होता.