Maharashtra Politics : महाविकास आघाडीतील सरकार म्हणजे बिघाडी सरकार होते, त्यांनी फक्त खंडणी …

Published on -

Maharashtra Politics : राज्यातील भाजप युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडवणीस यांचे सरकार हे जनतेचे सरकार असून, हे राज्याच्या विकासाला गती देणार सरकार आहे. मागील महाविकास आघाडीतील सरकार म्हणजे बिघाडी सरकार होते.

त्यांनी फक्त खंडणी वसूल करत आपले पापाचे घडे भरले, असे टीकास्त्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहुरी तालुक्यात राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या लाभार्थ्यांच्या साहित्य वाटपाचा कार्यक्रम याप्रसंगी मंत्री विखे बोलत होते.

पुढे ना.विखे पाटील म्हणाले, की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या देशात सर्वात जास्त लाभार्थ्यांची संख्या नगर जिल्ह्याची आहे.

केंद्राच्या एकूण उपलब्ध निधी तरतुदी ७८ कोटीपैकी ४२ कोटी नगर जिल्ह्याला मिळाले असून ४२ हजार पैकी १६ हजार ६३२ लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.

राज्यात भाजप युतीचे सरकार स्थापन झाल्या पासून राज्याच्या विकासाला गती मिळत आहे. मात्र यापूर्वीचे महाविकास आघाडीतील सरकार म्हणजे बिघाडी सरकार होते. त्यांनी फक्त खंडणी वसूल करत आपले पापाचे घडे भरले अशी टीका यावेळी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News